शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: परशुराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 04:20 IST

विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी अक्षय्यतृतीयेला अवतार घेतला

शैलजा शेवडे

विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी अक्षय्यतृतीयेला अवतार घेतला. रेणुकेच्या पोटी परशुराम, म्हणजेच भार्गवरामांनी याच दिवशी जन्म घेतला. म्हणून अक्षय्यतृतीयेच्याच दिवशी परशुराम जयंती.यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतअभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ।परशुरामाच्या जन्माच्या वेळीही अशीच स्थिती होती. ज्यांनी प्रजेचं संरक्षण करायचं, तेच प्रजेची लयलूट करत होते. अनाचार माजला होता. त्यामुळे भगवंताने वैशाख शुद्ध तृतीयेला जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी अवतार घेतला. तेच हे परशुराम. त्यांनी शिवाची आराधना करून शांकरविद्या मिळवली. महागणपतीकडून परशुविद्या मिळवली. अन्यायी, जुलमी राजांविरोधात २१ वेळा मोहिमा केल्या. त्यांना नेस्तनाबूत केले आणि शांतता निर्माण केली. त्यांचा जन्म गोरज मुहूर्तावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी झाला. म्हणून गोरज मुहूर्तावर त्यांची पूजा केली जाते. परशुराम चिरंजीव आहेत. म्हणून अक्षय्यतृतीयेला ‘चिरंजीवी तिथ’ असेही म्हणतात. परशुरामाच्या अवताराचं प्रयोजन सांगताना परमसद्गुरू गजानन महाराज म्हणतात,कोणी न उरला शास्ता, महत्संकट पातले,लुटावे, कोणी मारावे, ऐसे सर्वत्र जाहले ॥अन्याये सांडिली सीमा, धाके विश्व थरारले,जयांनी राज्य राखावे, घोर कर्मा प्रवर्तले ॥ऐसा समय पाहूनी, जन्मला अंश विष्णुचा,पवित्र भृगुच्या वंशी, सुपुत्र जमदग्नीचा ॥परशुरामांनी परमशिवांकडून शांकरविद्या मिळवली. तपाचरण करून गणेशालाही प्रसन्न करून घेतले. त्यांना महागणपतीकडून परशुविद्या मिळाली म्हणून त्यांना परशुराम म्हणतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक