शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: माणूस घडवणारा धर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:40 IST

व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे.

मोहनबुवा रामदासीराष्ट्रनिर्मिती ही केवळ पाच- १0 वर्षांसाठी नसते, तर माणसातला माणूसधर्म जागवणारा आणि जगणारा माणूसही धर्मस्थापना करीत असतो.समर्थ म्हणतात :धर्मसंस्थापनेचे नर। ते ईश्वराचे अवतार।झाले बहू पुढे होणार। देणे ईश्वराचे।।राष्ट्रधर्म ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. आजपर्यंत अनेक साधू, संत, क्र ांतिकारक, स्वातंत्र्यवीरांनी ही धर्मसंस्थापना केली व ती दीर्घकाळ सांभाळली. यातील दोन महान राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंत या भारतमातेच्या कुशीत जन्मले आहेत. यातील एक योद्धा संन्यासी श्री समर्थ रामदास स्वामी आणि एक संन्यस्त योद्धा स्वामी विवेकानंद. हे श्री समर्थ आणि स्वामी विवेकानंद या भारतमातेच्या पोटी जन्माला आले आणि या राष्ट्रसंतांनी माणसातला माणूसधर्म माणसाला शिकवला. त्याला हा माणूसधर्म जगण्याचा मार्ग दाखविला. प्रयत्नवाद हे दोघांचेही व्रत होते! कोणतेही राष्ट्र उभे करायचे असेल, प्रगत व्हायचे असेल तर सामान्य माणूस घडवला गेला पाहिजे. समर्थांनी धर्माची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणाले :सकळ धर्मामधे धर्म। स्वरूपी रहाणे हा स्वधर्म। परोपकारार्थ देह झिजविला पाहिजे. झिजण्यावाचून कीर्ती कैची। मना चंदनाचे परी त्वा झिजावे। परी अंतरी सज्जना निववावे।व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद या भूतलावर निर्माण झाले आणि समाजातील मरगळ दूर सारून देव, देश आणि धर्माची शिकवण त्यांनी समाजाला दिली. मन आणि मनगट सशक्त असेल, तर आपल्यावर चालून आलेली शक्ती निर्बल पाहायला मिळेल. म्हणून धर्माधिष्ठित राज्य हेच खरे रामराज्य असेल!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक