शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - तस्य वाचक: प्रणव:

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 05:31 IST

ॐ,प्रणव हे त्या परमेश्वराची ओळख आहे. परब्रह्माचे नाव आहे.

शैलजा शेवडेॐ,प्रणव हे त्या परमेश्वराची ओळख आहे. परब्रह्माचे नाव आहे. त्या सर्वव्यापी निश्चल, निर्मम अशा पूर्णब्रह्माने एक संकल्प केला, ‘एकोहरम, बहु स्याम'. तो संकल्प करायच्या आधी त्याने जो एक हुंकार केला, जो ध्वनी केला, तो ओंकार..ॐ. त्या ध्वनीच्या लहरी सगळीकडे पसरत गेल्या. त्यांनी सर्व काही व्यापून टाकले. ॐ कार. शब्द हरवतात, चित्त शून्य होते, तेव्हा ॐ कार ऐकू येतो. तो अस्तित्त्वाचा ध्वनी, अस्तित्वाची लय आहे. ते मनुष्याने दिलेलं नाव नाही. द्वैत संपल्यावरही एकच ध्वनी ऐकू येत राहतो. ॐ..जेव्हा कुणी समाधिस्थ होतो, तेव्हा ओंकाराचे गुंजन ऐकतो.

ब्रह्म असेल साध्य जर का, प्रणवाचे ते धनुष्य बनवा,आत्म्याचा तो बाण चढवूनी, लक्ष्य सहज ते प्राप्त करा।ओंकाराला अपुले करा, ब्रह्मलोक तो प्राप्त करा।ओंकाराचा जप तो करा, ओंकाराचा जप तो करा।ओंकार असे तो स्वर विश्वाचा, स्वर एकाक्षर ब्रह्माचा,ओंकारच पर, अपर ब्रह्म अन, अंकुर ब्रह्मबीजाचा,नाद अनाहत तो ओंकार, सर्व व्यापक तो ओंकार,आनंदाला प्राप्त करा, ओंकाराचा जप तो करा।विश्वनिर्मिती असे ज्यातूनी, परमात्म्याचे भान ओंकार,चलायमान हे विश्वच सारे, चराचरी घुमतो ओंकार,प्रथम ध्वनी तो ओंकार, आदि मध्य अंताच्या पार,

आत्मिक बल ते प्राप्त करा, ओंकाराचा जप तो करा। ओंकार सत्य आहे. आपले आंतरिक अस्तित्व आहे. ओंकाराच्या ध्वनीलहरी पृथ्वीपासून आकाशात दशदिशात प्रतिध्वनित होतात. ओंकार शिवत्त्वाचे प्रतीक आहे. ओंकारात तीनही देव सामावले आहेत. ‘अ’कार ब्रह्म, ‘उ’कार विष्णू आणि ‘म’कार महेश दर्शवतात. ओंकार ध्वनी सर्वात पवित्र आहे, दिव्य आहे. त्याच्याहून अधिक सुंदर काहीही नाही. ओंकाराचा अर्थ जाणून घेऊन त्याची साधना केली, तर आपले जीवनच बदलून जाते. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक