शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: मनाची कोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:21 IST

आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते.

विजयराज बोधनकरराहुल आणि अरविंद दोघे एकाच शाळेत शिकले. राहुल जागृत होता. तो नेहमी म्हणायचा, वर्तमानाच्या तळहातावर जगण्यासाठी मोहाला व अनाठायी ईर्ष्येला मुठीत ठेवणे गरजेचे असते. कारण प्रत्येकाचं मन काचेसारखं असतं. आपल्यासोबत ज्यांनी इतरांची मने सांभाळलीत, ती मने आपोआप समृद्ध होत जातात, पण अरविंद हा भूतकाळाच्या मोहात अडकलेला एक दुर्दैवी जीव होता. बऱ्याचदा भूतकाळ हा पोकळ गोष्टीसाठी झुरवतो, ठगवतो, हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नव्हता. राहुल नेहमी अरविंदला सांगायचासुद्धा की, जो सतत वर्तमानाच्या दिशेने चालत राहतो, तो मागे वळून कधीच पाहात नाही. कारण मागे असतात फक्त भाविनक खड्डे. फक्त भावनेपोटी बुद्धीची भेट झाली नाही तर वर्तमानाच्या स्वागतासाठी ऊर्जा निर्माण तरी कशी होणार? धनापेक्षा मनाची कोडी जो सोडवतो तो कुठल्याही सर्वोच्च पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो आणि बुद्धीचा उपयोग जर शिवरायांच्या पावलांनी केला, तर रावणाला संपविणारा मोह चटणीलासुद्धा उरणारा नसतो. निसर्ग हा सतत शिकवत असतो, पण त्याच्या शाळेकडे बोटावर मोजावी इतकीच माणसे लक्ष देऊन शिकत असतात. सहजसुख सर्वांनाच हवं असतं. त्यासाठी दुबळी माणसं खूप नानातºहेचे कल्पनेतील किंवा खोटे मार्ग शोधतात. शॉर्टकटने आलेलं सुख त्याच मार्गानं निघून जातं. आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते. तीच प्रामाणिक कमाई आयुष्याला श्रीमंत करून जाते. जग त्याच्यासोबत असतं. निसर्गनियमांचे पालन करून जो सातत्याने कर्म करतो तोच अनेक निरर्थक मोहाचे पिंडदान करू शकतो व मोहातून सुटका करून घेतो. याचमुळे आंतरिक कौशल्य बाहेर येत असेल तर विजयाचा आलेख वरती नेताना कोण थांबवू शकतो?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक