शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - दुरितांचे तिमिर जावो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:43 IST

साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसाने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते. ‘‘विठ्ठला! गोऱ्या-गुबगुबीत मुलाला कुणीही जवळ घेईल आणि त्याला कुरवाळू लागेल, पण त्या मुलास जवळ घेण्याची गरज आहे, ज्याचे जगात कुणीच नाही, अन्नपाण्याविना जे तळमळत आहेत. तुझी ही सारी लेकरे अशीच आहेत. त्यांना प्रथम जवळ घेण्याचे काम कर. त्यांना तुझे खरे स्वरूप दर्शन दे आणि तू खरंच लेकुरवाळा आहेस हे तुझ्या कृतीने सिद्ध कर.’’ साने गुरुजींची ही हाक पांडुरंगाने ऐकली असावी. त्यामुळे तो समतावादी देवाधिदेव झाला. गुरुजींच्या या प्रार्थनेचे बीजांकुर संत ज्ञानदेवांच्यादुरितांचे तिमिर जावों। विश्व स्वधर्म सूर्य पाहों।जो-जे वांछील। तो ते लाहों प्राणीजात।

या पसायदानातील ओवीत प्रतिबिंबित झालेले दिसते. ज्ञानदेवांच्या कालखंडात सहस्रावधी स्त्री-पुरुष धर्म-कर्माच्या काल्पनिक बंधनांनी करकचून आवळले गेले होते. मनुष्य मनुष्याला उराउरी भेटू शकत नव्हता. तेथे जाती-धर्माबरोबरच ज्ञानी-अज्ञानीपणाची कुंपणे आडवी येत होती. देवत्वाची जाणीव व स्वस्वरूपाचे ज्ञान यापासून तळागाळातला माणूस शेकडो योजने दूर होता. आध्यात्मिक क्षेत्रात तर त्याच्यावर आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण एवढेच म्हणायची वेळ आली होती. ज्ञानेश्वरासारख्या बहिष्कृताने समाजातील नाहीरे वर्गाचे पारमार्थिक संघटन केले आणि ज्ञानापासून दुरावलेल्या मंडळींच्या जीवनात ज्ञानेच्छा निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले. वास्तविक पाहता ब्रह्म, माया, मोक्ष, मुक्तीच्या गप्पा मारल्याने ‘स्व’ला जाणून घेण्याचे ज्ञान होत नाही. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक