शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:39 IST

‘अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे? मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना? अस मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना?

रमेश सप्रे

घरातील सर्व मंडळी एकत्र येण्याचा कार्यक्रम म्हणजे रात्रीची देवघरात केली जाणारी उपासना. आनंदाला ही वेळ खूप आवडायची. कारण आजी-आजोबा, आई-बाबा, ताई नि स्वत: तो एवढंच नव्हे तर आजीची काळजी घेणारी दाई नि घरातला काम करणारा नोकर विठोबा सारे यायचे नि एकत्र एकसुरात श्लोक, स्तोत्रं, अभंग म्हणायचे.एवढंच नव्हे तर एरव्ही इकडे तिकडे भटकणारी मनू मांजरीही कुणाच्या ना कुणाच्या मांडीवर विसावायची. विठोबा रोज एक भजन म्हणायचा. किती आर्तता असायची त्याच्या आवाजात! आनंदाला त्या भजनाचा अर्थ कळायचा नाही; पण भाव मात्र त्याच्या हृदयाला स्पर्श करायचा; पण सर्वात जिवाचे कान करून तो ऐकायचा ते मंत्रपुष्पांजलीचे श्लोक, शांतीमंत्र आणि सर्वांचं कल्याण चिंतणारी शेवटची प्रार्थना.त्या प्रार्थनेतील दुसरा श्लोक म्हणताना तो हमखास चुकायचा. मग आजोबा त्याच्याकडे हसून पाहायचे त्याला आपली चूक कळायची. आज पुन्हा चुकलो म्हणून तोही हसायचा. मग गडबळीनं ती ओळ पुन्हा म्हणत इतरांच्या सुरात सूर मिसळायचा.कोणता हाता असा तो श्लोक? आपली अशी नेहमी नेहमी चूक कशी होते?‘सदा सर्वदा’ म्हटल्याबरोबर आपण यांत्रिकपणे ‘योग तुझा घडावा’ असं कसं म्हणतो? प्रार्थनेतील ही यांत्रिकता तिच्यातील मांत्रिकतेला छेद देणारी नव्हे का? एवढे गंभीर विचार करण्याएवढा आनंदा मोठा नव्हता; पण रोज उपासनेनंतर प्रसाद देऊन खाऊन झाल्यावर आजोबा त्याला समजावून सांगायचे.‘अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे? मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना? अस मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना?‘सदासर्वदा’ म्हटल्याबरोबर तुझी गाडी ‘योग तुझा घडावा’ या चुकीच्या रुळावर जाते ना? उद्या न चुकता श्लोक म्हणायचा बरं का!’असं म्हटल्यावर आनंदा लगेच पूर्ण श्लोक बरोबर म्हणून दाखवी.सदा सर्वदा चिंतित देव पाहो।सदा वृत्ति हे शुद्ध नि:संग राहो।यश: श्री सदानंद कल्याणमस्तु।तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु...या निमित्ताने सर्वांच्या दृष्टीनं आनंद प्राप्तीसाठी एक महत्त्वाचं सूत्र स्पष्ट होत असे. कोणतंही काम उच्च किंवा नीच नाही. बाबा नेहमी म्हणत ‘नो वर्क इज लोवली, एव्हरी कर्व इज होली’ म्हणजे कोणतंही काम खालच्या दर्जाचं नसतं. प्रत्येक काम हे पवित्रच असतं. त्याचं आणखी एक सांगणं सर्वांना जीवनातील महत्त्वाचा पाठ शिकवून जायचं.‘यंत्र हा देव आहे आणि श्रम ही त्याची पूजा आहे.’ ‘प्रत्येक जण कुठं यंत्र वापरतो? असं विचारल्यावर ते हसत हसत म्हणत, ‘यंत्र म्हणजे कारखान्यातलं मशीन एवढाच अर्थ नाही काही, तर स्वयंपाकघरातही अनेक यंत्रं असतात. स्रानगृहातही असतात. आपली कामाची साधनं, हत्यार ही सारी यंत्रच की! मिक्सर हे यंत्र तसंच पोळपाट-लाटणंही यंत्रच. वॉशिंग मशीन हे यंत्र तशी बादली-लोटा किंवा शॉवर ही सारी यंत्रच. त्यांना देव मानलं, त्यांचा योग्य उपयोग केला, त्यांची स्वच्छता, योग्य निगा राखली की त्यांची पूजाच करणं नव्हे का? दसऱ्याच्या दिवशी या सा-या साधनांची पूजा करणं तसेच पोळ्याच्या दिवशी बैलाची कृतज्ञतापूर्वक पूजा करणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. अशी सवय लागली, अशी मनोवृत्ती तयार झाली की सारं जीवनच एक मंदिर बनून जातं नि प्रत्येक क्रिया-कृती-कर्म बनून जातं अखंड आराधना.बाबांच्या अशा विचारांचे तरंग आनंदाच्या मनात वारंवार उठत. तो शांत बसून विचार करत असे. हळूहळू जीवन त्याच्यासमोर उलगडत जाई. तो कायम आनंदात असे. त्या श्लोकाचा अर्थ त्याला न कळत समजत असे. तो न चुकता म्हणण्याचा निश्चय करत असे. ‘सदासर्वदा चिंतिता देव पाहो।’ म्हणजे सतत सर्व वस्तूत, व्यक्तीत देवदर्शन झालं तर ‘सदा वृत्ति हे शुद्ध नि:संग राहो।’ म्हणजे मनोवृत्ती शुद्ध पवित्र राहिल आणि कशातही फार गुंतून न पडता आपण त्याची सेवा करत राहू किंवा त्याचा उपभोग घेत राहू, मग हृदयाच्या गाभाºयातून आशिर्वादपूर्वक तथास्तुरुपात जीवनातील यश, वैभव (श्री), कल्याण नि नित्य आनंदासाठी प्रतिसाद मिळेल हा प्रतिसाद म्हणजेच प्रसाद!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक