शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक : साधनाहीन प्रार्थना निरर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:28 IST

स्तुती आणि प्रार्थना यांचा परस्पर संबंध आहे. कामनापूर्तीसाठी प्रार्थना केली जाते, तर कामना पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते; परंतु साधनाहीन प्रार्थना सर्वदा निरर्थक ठरते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)स्तुती आणि प्रार्थना यांचा परस्पर संबंध आहे. कामनापूर्तीसाठी प्रार्थना केली जाते, तर कामना पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते; परंतु साधनाहीन प्रार्थना सर्वदा निरर्थक ठरते. प्रार्थना रोज करावी. प्रार्थनेने मनुष्याला आत्मिक शांती मिळते. प्रार्थना स्वत: किंवा सामूहिक करा. सामूहिक प्रार्थनेत एक वेगळी शक्ती निर्माण होते. ऊर्जावलयं कित्येक पटीने निर्माण होतात. त्यामुळे परिवार, समाज, राष्ट्र यांना एक नवचैतन्य प्राप्त होते. प्रार्थना केल्यामुळे ती ऊर्जा आपल्या शुभकार्यात मदत करते. म्हणून तर ज्ञानदेवांनी वैश्विक प्रार्थना केली.जो जशी कामना करतो तसे त्याला फळ मिळते. प्रार्थनेत अमोघ शक्ती आहे. प्रार्थनेमुळे साधक प्रबळ बनतो. सुदृढ राहातो. इच्छाशक्ती, आत्मशक्ती जागृत होते. एक सर्वव्यापी परमात्मा त्याची प्रार्थना महत्त्वाची आहे. हा जीवनरथ सुखी-संपन्न करायचा असेल तर प्रार्थना करावी. जीवनात रमणीय सृष्टी निर्माण होते. कर्म चांगले पडते. चांगले कर्म घडले की आत्मशक्तीचा विकास होतो. जीवन संकुचित मार्गाने आपण जगत नसतो. प्रार्थनेतून दिव्यातिदिव्य संदेश मिळतात. आपल्याला कर्तव्याची जाणीव होते. जीवनात आनंद उपभोगता येतो. प्रार्थनेमुळे आपले जीवन नष्ट-भ्रष्ट होत नाही. जीवनात नास्तिकता येत नाही. आपल्या हातून अधर्माचरण घडत नाही. प्रतिदिन प्रार्थना केल्यास जीवनक्रांती प्रकाशमान होते. जीवनात एक आदर्श पद्धती निर्माण होते. आपण प्रार्थनेमुळे नेहती प्रसन्न राहातो. जीवन छिन्न-विछिन्न होत नाही. प्रार्थनेमुळे मनात प्रसन्नता निर्माण होते.प्रसन्न मन जीवन प्रकाशमान व तेजस्वी करते. साधकाला सुबोध होतो. स्वयंभू असलेल्या आत्मस्वरूपाचे रूप हळूहळू लक्षात येते. जीवनरूपी यज्ञात आत्मरूपी कुंडात सुमंगलेच्या आहुती दिल्या जातात. त्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यावर विजय प्राप्त करण्यासाठी आत्मिक बळ मिळते. आत्मिक बळ सर्व बळांत श्रेष्ठ बळ आहे. आत्मबळ सर्व बळांचे मुख्य बळ आहे. त्यामुळे आत्मिक बळ निर्माण होण्यासाठी प्रार्थना महत्त्वाची आहे. नि:संदेह ईश्वराची प्रार्थना करा, जीवन उज्ज्वल होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक