शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अभंग श्रवणाने मन प्रसन्न होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 06:15 IST

२१ वे शतक विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण प्रगती करताना संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा, डोळ््यांनाही न दिसणारा ‘कोविड- १९’ या विषाणूने धुमाकूळ घातला आहे.

२१ वे शतक विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण प्रगती करताना संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा, डोळ््यांनाही न दिसणारा ‘कोविड- १९’ या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यामुळे भारतासह महाराष्ट्रातसुद्धा लॉकडाऊन आहे. पानटपरीपासून ते मोठ-मोठ्या कंपन्यांपर्यंत, अगदी कीर्तनापासून ते गावोगावाच्या जत्रा ते तमाशापर्यंत, लग्नापासून ते श्री. विठ्ठलाच्या चैत्री वारीपर्यंत सर्वच बंद झाले आहे. अशावेळी या आजारावर स्वत:च्या व समाजाच्या सुरक्षिततेसाठी घरांमध्येच राहणे हा एकमेव पर्याय आहे. अचानक झालेल्या या बंदमुळे अनेक सर्वसामान्य मजुरांपासून ते मोठ-मोठ्या उद्योगपतीपर्यंत सर्वांचेच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरांमध्येच राहण्याची अचानक वेळ आल्यामुळे मनशांती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी काय करावे, कोणत्या गोष्टी मनशांती देतील, याचा विचार प्रत्येकाला करावाच लागेल.कोरोनाशी निगडित बातम्या टीव्हीवर २४ तास पाहिल्यामुळे, मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक त्रास जाणवतो, ताण-तणाव वाढतो. लॉकडाऊन हा काळ आपल्या आयुष्यातील सर्वात संघर्षाचा काळ आहे. पण त्याचा संधी म्हणूनही वापर करता आला पाहिजे. स्वत:च्या कुटुंबाला वेळ देणे, टीव्हीवर येणाऱ्या बातम्या माहिती म्हणून थोडा वेळ पाहणे, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल व टीव्ही या गोष्टींच्या अतिवापराने मेंदूवर, डोळ््यावर अतिताण पडतो. अशावेळी वेगवेगळी पुस्तके, ग्रंथ, वाचले तर निश्चितच आपल्या ज्ञानात भर पडेल, यात काही शंका नाही. पुस्तक हा माणसाचा मित्र आहे. त्यामुळे ताण-तणाव कमी करण्यास त्याची मदत होते. रोज सकाळी, पहाटे लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, योगासने करावीत. यासोबतच अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीते यांचे श्रवण करावे. सकस आहार घेणेही गरजेचे आहे. ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील लहान मुलांसमवेत किंवा इतर सदस्यांसमवेत विविध खेळ खेळावेत. घरातील कामे करावीत. शेती असेल तर शेतीची कामे करावीत. सतत शरीर व मनाला कशात ना कशात गुंतवून ठेवावे. कोरोनाविषयी येणाºया विविध बातम्यांमुळे मनात प्रचंड भीती निर्माण होते. परिणामी माणूस खचून जातो. यासाठी आपण कुटुंबासोबत असताना नकारात्मक संवाद टाळावा.वैयक्तिक व घरातील स्वच्छतेवर भर देणे अत्यावश्यक आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून येणाºया विविध सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टीवर सत्यता तपासल्याविना विश्वास ठेऊ नये. या काळात अनेक अफवांचे पेव फुटलेले आहे. याकडे लक्ष न देता आपले मन स्थिर ठेवावे. सजग, सावध राहणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलीस प्रशासन हे अवितरपणे काम करीत आहेत. त्यामुळे आपण त्यांना घरात राहूनच योग्य सहकार्य करायचे आहे. आपली एकता टिकवणे, आपल्या गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात एखादी व्यक्ती बाहेर गावातून आलीच तर खबरदारी म्हणून त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे मन शांत राहील.मन:शांतीसाठी वाद्य वादन, गायन, वाचन, मनन, चिंतन असे अनेक नामस्मरणाचे प्रकार आहेत. त्यातच आपण रमले पाहिजे. संत श्री तुकाराम महाराज म्हणतात,सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे ॥१॥तयाच्या चिंतने निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु॥जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम । धरीं हा चि नेम अहर्निशी ॥२॥तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥याप्रमाणे आपण अखंड नामस्मरण, चिंतन केले तर अनेक संकटे दूर होतील. म्हणजे घरात बसून नामस्मरण केले तर प्रशासनावर ताण येणार नाही, हाच अर्थबोध यातून घ्यायचा आहे. आपला बेजबाबदारपणा या रोगाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच स्वत:च्या, कुटुंबाच्या व समाजाच्या स्वास्थ्याची काळजी घ्यायची आहे. रामकृष्णहरी!

वेगवेगळी पुस्तके, ग्रंथ, वाचले तर निश्चितच आपल्या ज्ञानात भर पडेल, यात काही शंका नाही. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, योगासने करावीत. यासोबतच अभंग, गवळणी, भावगीते, भक्तिगीते यांचे श्रवण करावे. गीते ऐकल्याने मन प्रसन्न होते. सकस आहार घेणेही गरजेचे आहे. मन:शांतीसाठी वाद्य वादन, गायन, वाचन, मनन, चिंतनात सर्वांनी रमले पाहिजे.निवृत्ती महाराज इंदोरीकर