शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जोडोनिया धन उत्तम व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:33 IST

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. 

धर्मराज हल्लाळे

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. संसारात राहूनही इतरांच्या भल्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीचा विचार त्यांच्या अभंगातून पेरला गेला आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे... ही त्यांची अभंगओळ बरेच काही सांगून जाते. आज आपण नेहमी म्हणतो, माणूस पैशाच्या मागे धावू लागला आहे. वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळविणे हे त्याचे ध्येय बनले आहे. पैशातून सुख आणि सुखासाठी पैसा हे जणू सूत्रच सांगितले जाते. आश्चर्य म्हणजे त्याला आपण व्यवहार म्हणतो. असा हा सगळा खोटा व्यवहार आपल्या भोवती घडत असतो. ज्याच्यामध्ये आपणही विलिप्त झालो आहोत. याचा अर्थ प्रबोधनाचा वसा घेतलेल्यांनी धनाचा लोभ सोडून द्यावा आणि घरावर तुळशीपत्र ठेवावे हे अभिप्रेत नाही. संत तुकाराम महाराजांनीही परमार्थ सांगताना जीवनार्थ सोडून द्यायला सांगितला नाही. धन जमविलेच पाहिजे. केवळ ते उत्तम मार्गाने मिळवावे, असा उपदेश अभंगातून केला आहे. जे धन तुम्ही जोडणार आहात ते उत्तम व्यवहारातून जमविलेले असावे एवढेच सांगायचे आहे.

समाजात अगदी दोन टोकांचे विचार दिसतात. ज्यांनी संत विचार मांडला अथवा अंगिकारला, त्यांच्याकडून टोकाच्या त्यागाची अपेक्षा केली जाते. अन् जे संत विचारापासून दूर आहेत, ते जणू काही दुर्व्यवहार करायला मोकळेच आहेत. तुम्ही चांगले वागता म्हणजे तुमच्यात त्यागवृत्ती असली पाहिजे. धनाचा लोभ नसला पाहिजे. इथपर्यंत ठिक आहे. पण धन मिळवूच नये असे नाही. चरितार्थ चालविण्यासाठी धन आवश्यक आहे. अनेकांना सोबत घेऊन जाण्यासाठी अधिक धनाची आवश्यकता आहे. अर्थात हे धन सद्मार्गाने मिळवावे हा अभंगातील गर्भित अर्थ आहे.

जमेल त्या मार्गाने, वाट्टेल त्या दिशेने धनासाठी भरकटणारी माणसे उत्तम व्यवहार करीत नाहीत. त्यांचा धनसंचय हा अमान्य आहे. त्यातून अपप्रवृत्तीच जन्माला येतात. भरमसाठ धनाच्या लोभातून सुखाचा शोध घेतला जातो परंतु, प्रत्यक्षात तो दु:खाच्या मुळाशी जातो. त्याचा व्यवहार अवतीभोवतीच्या माणसांवरच नव्हे तर समाजावर विपरित परिणाम करणारा ठरतो. तो धन मिळवितो, मात्र स्वत:ची ओळख गमावतो. अखेरीस धनसंचय आवश्यक असला तरी त्याचा मार्ग कोणता यावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. सद्मार्ग सोडून जोडलेले धन विनाश बुद्धीला जन्म देते. उत्तम व्यवहाराने जोडलेल्या धनामुळे माणुसकी धर्माचा उदय होतो. सद्मार्गाचे धन त्याचे, परिवाराचे आणि समाजाचेही कल्याण साधते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक