मराठा आरक्षण लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:39 IST2018-07-23T21:39:40+5:302018-07-23T21:39:57+5:30
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षण लागू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक विश्रामगृहातून निघालेला मोर्चा सोमवारी जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यात यावी. मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर वसतिगृह बांधण्यात यावे. ओबीसीकरिता नॉनक्रि मिलेअरची अट रद्द करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक तातडीने उभारण्यात यावे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आदी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी राजाभाऊ ठाकरे, नानाभाऊ गाडबैल, राजेंद्र गायकवाड, वसंतराव घुईखेडकर, डॉ. दिलीप महाले, अनिल वाघचोरे, बाबासाहेब गाडे पाटील, अनिल गायकवाड, प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, कैलास राऊत, वैशाली सवई आदी उपस्थित होते.