वाशिम पालिका उपाध्यक्षपदी वाघमारे
By Admin | Updated: January 1, 2017 01:16 IST2017-01-01T01:16:35+5:302017-01-01T01:16:35+5:30
स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे माणिक देशमुख, भाजपाचे बादशाह गुलाटी आणि भारिप-बमसंचे बबलू खान यांची वर्णी लागली आहे.

वाशिम पालिका उपाध्यक्षपदी वाघमारे
वाशिम, दि. ३१- नगर पालिका उपाध्यक्षपदी भाजपाचे रुपेश वाघमारे यांची निवड झाली असून स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे माणिक देशमुख, भाजपाचे बादशाह गुलाटी आणि भारिप-बमसंचे बबलू खान यांची वर्णी लागली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या अशोक हेडा विजयी झाले. ३१ डिसेंबर रोजी उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवडणूक झाली. यात पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष हेडा यांनी काम पाहिले. उपाध्यक्षपदाकरिता रुपेश वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्यत्वाकरिता भाजपाकडून बादशाह गुलाटी, बबलू खान, धनंजय हेंद्रे, सतीश उर्फ गल्ला वानखेडे यांनी यासाठी अर्ज भरले; तर सेनेकडून माणिक देशमुख आणि बाळू शिंदे यांनी नामांकन दाखल केले. यात हेंद्रे, वानखेडे आणि शिंदे या तिघांचे अर्ज रद्द ठरल्यामुळे गुलाटी, खान आणि देशमुख यांची निवड झाली.