वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी विजेचे नियोजन करताना महावितरणची दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:48 IST2017-11-08T13:47:30+5:302017-11-08T13:48:54+5:30

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी विजेचे नियोजन करताना महावितरणची दमछाक!
वाशिम: आगामी रब्बी हंगामात उपलब्ध जलस्त्रोतांव्दारे शेतकºयांकडून कृषीपंपांव्दारे सिंचन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी वीज आवश्यक ठरणार असून त्याचे नियोजन करताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे विरोधी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या विरोधामुळे कृषीपंपांची ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी वसूल करणे अशक्य ठरत असल्याने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: हैराण झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकºयांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफुल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होते. यंदा मात्र स्थिती चिंताजनक असून पर्जन्यमान घटल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यातुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने घरगुती, वाणिज्यिक, व्यावसायिक, पाणीपुरवठा योजना या घटकांना वीज पुरवून कृषीपंपांनाही वीज पुरविण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. यात अधिकारी, कर्मचाºयांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.