भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल - कुलगुरू डॉ. चांदेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:31 PM2018-01-25T15:31:14+5:302018-01-25T15:34:12+5:30
कारंजा : आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.
कारंजा : भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. विविध आक्रमणे झेलुन सुध्दा या संस्कृतीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. जगाला याचेच आश्चर्य वाटते आहे. आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.
स्थानिक किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार २३ जानेवारी रोजी भारतीय संस्कृती संवर्धनामध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि.बी.जी.ई. सोसायटी, अकोला चे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा होते. यावेळी विषेश उपस्थिती म्हणून अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठाचे पिठाधिष प.पू.आचार्य श्रीजितेंद्रनाथ महाराज मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून विष्वमांगल्य सभेच्या अ.भा.संघटन प्रमुख डॉ.वृृशालीताई जोषी,तसेच बी.जी.ई सोसायटी अकोला चे कार्यकारणी सदस्य डॉ.सत्यनारायण बाहेती, अनिलजी तापडीया व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.विनय कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चा सत्राची विधीवत सुरुवात सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. उद्घाटनपर भाषनात कुलगुरु यांनी भारतीय संस्कृती संवर्धन व रक्षणामध्ये स्त्रियांच्या भूमीकेचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. आचार्य श्रीजितेंन्द्रनाथ महाराज यांनी मत व्यक्ते केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनय कोडाप े यांनी केले. कार्य क्रमाचे संचालन डॉ.किरण वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. प्रकाश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाºयांंनी प्रयत्न केले.