घराच्या भिंतीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Admin | Updated: July 4, 2017 02:22 IST2017-07-04T02:22:59+5:302017-07-04T02:22:59+5:30

शिरपूर जैन : भरधाव असलेल्या दुचाकीची घराच्या भिंतीला धडक लागून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ३ जुलै रोजी कुकसा (ता.मालेगाव) येथे घडली.

Falling to the wall of the house; Two-wheeler death | घराच्या भिंतीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

घराच्या भिंतीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : भरधाव असलेल्या दुचाकीची घराच्या भिंतीला धडक लागून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ३ जुलै रोजी कुकसा (ता.मालेगाव) येथे घडली.
कुरळा येथील गजानन निवृत्ती देवघरे हा इसम विना क्रमांकाच्या दुचाकीने मालेगावकडे येत असताना कुकसा येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट एका घराच्या भिंतीला धडक मारली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथे एका वाहनाने नेला जात होता. त्या वाहनापाठोपाठ शिरपूर पोलीस स्टेशनला नव्यानेच मिळालेल्या एम.एच.३७ ए ४१३६ या क्रमांकाच्या वाहनात पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, रामेश्वर जोगदंड, शंकर दाभाडे व चालक साखळकर हे रिसोडला जात असताना नेतन्सा ते आंचळ गावादरम्यान अचानक वाहनाचे चाक निसटले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

Web Title: Falling to the wall of the house; Two-wheeler death