महाशिवरात्रीनिमित्त रिसोड येथे १२ प्रतिकात्मक ज्योतीर्लिंगांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 05:49 PM2019-03-03T17:49:07+5:302019-03-03T17:49:44+5:30
रिसोड (वाशिम): प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने महाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीनेमहाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या औचित्यावर ४ आणि ५ मार्च रोजी शिवभक्तांना १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक महत्व समजून घेता येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘राजयोग हा श्रेष्ठ योग’, याची माहिती देण्यात येणार आहे. परमपिता परमात्मा शिव परमात्म्याची जयंती ब्रह्माकुमारिज विद्यालयाच्यावतीने हर्षोल्हासात साजरी करण्यात येत आहे. ब्रह्माकुमारी ज्योती दिदीसह, ब्रह्माकुमारी गिता दिदी, ब्रह्माकुमारी वंदना दिदी, ब्रह्माकुमारी वर्षा दिदीसह सर्वच ज्ञानार्थीनी ज्योतीलिंर्गाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांनी रिसोड शहरासह सर्वच शिवभक्तांनी प्रदर्शनीला भेट देऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.