५० वर्षीय इसमावर कुऱ्हाडीने हल्ला

By Admin | Updated: May 4, 2017 01:24 IST2017-05-04T01:24:24+5:302017-05-04T01:24:24+5:30

मानोरा : मजुरीसाठी कामावर का लावत नाही, अशा क्षुल्लक कारणावरुन एका मजुराने सुखदेव भाटू राठोड (वय ५० वर्षे) या इसमावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

50-year-old Ismaver Kurhadi attacked | ५० वर्षीय इसमावर कुऱ्हाडीने हल्ला

५० वर्षीय इसमावर कुऱ्हाडीने हल्ला

मानोरा : मजुरीसाठी कामावर का लावत नाही, अशा क्षुल्लक कारणावरुन एका मजुराने सुखदेव भाटू राठोड (वय ५० वर्षे) या इसमावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात राठोड गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ३ मे रोजी दाखल फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी श्यामराव भाऊराव घोरसडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारवा मोगन येथील फिर्यादी सुखदेव राठोड हे ३ मे रोजी नित्यनेमाप्रमाणे इतर मजुरांना कामे देण्यासाठी गेले असता, आरोपी श्यामराव घोरसडे याने त्यांच्याशी वाद घालत मला कामावर का लावत नाही, असे म्हणून राठोड यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात राठोड हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसांनी कलम ३२४ भादंविनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार रमेश बोडखे, संजय गोतरकर करीत आहेत.

Web Title: 50-year-old Ismaver Kurhadi attacked