मदत करा हो! तो याचना करत होता, सगळे व्हिडीओ काढत होते; मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 07:48 AM2021-08-14T07:48:40+5:302021-08-14T07:48:54+5:30

२० ते २५ मिनिटे ट्रकच्या चाकाखाली तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता; मात्र मदतीसाठी कोणी पुढे आले नाही. 

youth cries for help after accident crowd shoots video instead of helping him | मदत करा हो! तो याचना करत होता, सगळे व्हिडीओ काढत होते; मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही

मदत करा हो! तो याचना करत होता, सगळे व्हिडीओ काढत होते; मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही

Next

नालासोपारा : अपघातात रक्तबंबाळ झालेला तरुण मदतीसाठी याचना करत होता; पण बघे मात्र मदत करण्याऐवजी आपल्या मोबाइलमध्ये त्याचे फोटो आणि शूटिंग करत होते. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हात जोडत होता; पण मदतीसाठी मात्र एकही हात पुढे आला नाही.

नारिंगी येथील फाटकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले. यात कुणाल तांडेल हा तरुण जखमी झाला. अपघातात त्याच्या पायावरून ट्रकचे टायर गेल्याने कंबरेच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाली. २० ते २५ मिनिटे ट्रकच्या चाकाखाली तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता; मात्र मदतीसाठी कोणी पुढे आले नाही. 

गुरुवारी दुपारी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अपघातग्रस्त तरुणाचा व्हिडिओ काढण्यात मश्गुल असताना समोर आले आहे; पण त्याला उचलून दवाखान्यात नेण्याचे कोणी धाडस दाखविले नाही. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. शेवटी नावेद खान या संवेदनशील तरुणाने पुढाकार घेऊन जखमी तरुणाला तत्काळ रिक्षात टाकून रुग्णालयात दाखल केले आहे. यात तरुणाचा जीव वाचला आहे.

Web Title: youth cries for help after accident crowd shoots video instead of helping him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.