एसटीच्या राज्यव्यापी संपामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी, वडाप वाहतूकवाल्यांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:48 IST2017-10-18T05:48:21+5:302017-10-18T05:48:31+5:30
महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी सोमवार मध्यरात्री पासून पगारवाढी साठी संप पुकारल्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत दररोज १ लाख २० हजार किमी चा एसटी चा प्रवास थांबला असून

एसटीच्या राज्यव्यापी संपामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी, वडाप वाहतूकवाल्यांची चांदी
- हितेन नाईक
पालघर : महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी सोमवार मध्यरात्री पासून पगारवाढी साठी संप पुकारल्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत दररोज १ लाख २० हजार किमी चा एसटी चा प्रवास थांबला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर ह्या संपामुळे तब्बल २ लाख २५ हजार प्रवाश्यांना फटका बसून सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.
एसटी कामगार संघटना, चार श्रमिक संघटनासह इतर चार संघटनांनी महामंडळाला सातवा वेतन आयोगाचा लाभ अंशत: मिळावा व पगारवाढ करण्यात यावी ह्यासाठी सोमवारच्या मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. ह्या संपाला लातूरच्या कामगार न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही संघटना आपल्या मागण्यांसाठी संपाच्या भूमिकेवर ठाम राहीली. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ही सेवा मंगळवारी मध्यरात्री पासून ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाश्यांच्या मोठे हाल झाले. हा संप होऊ नये यासाठी एसटी प्रशासन कर्मचाºयांना आवाहन करीत आहे.
पालघर एसटी विभागांतर्गत राज्यभर विविध भागात होणाºया बस फेºया द्वारे दररोज १ लाख २० हजार किमी चा पल्ला गाठला जात असून सुमारे ४० लाखाचे उत्पन्न महामंडळास मिळते. या संपामुळे दररोज एसटी सेवेद्वारे प्रवास करणारे २ लाख २५ हजार प्रवाश्यांचे हाल झाले असून प्रवाश्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने चाकरमानी, कामगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक ह्यांना ह्या संपाचा मोठा फटका बसला आहे. हा संप ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारल्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे खरेदी करायला आलेल्या अनेकांना वडाप वाहतुकीची आधार घ्यावा लागला. त्यात खाजगी वाहतूकदारांनी चांगलीच कमाई केली. त्याचप्रमाणे पालघरमधील ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकांचा मंगळवारी निकाल असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून एसटीतून येणारे विविध पक्षाचे कार्यकर्ते येऊ न शकल्याने आर्यन शाळेच्या परिसरात गर्दीच प्रमाण तुलनेने कमी राहीले.
जिल्ह्यातील बागायतदार मुंबईकडे शेतमाल नेण्यासाठी सकाळी एसटीचा मार्ग धरतात मात्र संपामुळे बागायतदारांना फटका बसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. दरम्यान, विभाग नियंत्रक अजित गायकवाड, चौधरी ह्यांनी संप चिघळल्यास सर्व आगार व बस स्थानके ह्यांना बंदोबस्त मिळावी अशी मागणी केली.
जव्हार आगारातील
शुकशुकाट; प्रवाशी बेहाल
जव्हार : वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाला आहे. जव्हार मध्ये संपाचा पहिला दिवस शंभर टक्के यशस्वि झाला असून प्रवाशांचे मोठे हाल झाले. मध्यरात्री पासून एक ही बस स्थानकातून बाहेर पडलेली नाही. राज्यांतील इतर महामंडळातील कर्मचाºयांपेक्षा कमी पगारी एस.टी.महामंडळातील कर्मचाºयांना मिळत असल्याने सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी तयार करून एस.टी.कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे. ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. खाजगी गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करावा. जाचक परिपत्रके रद्द करावेत. चालक कम वाहकांची संकल्पना त्वरीत रद्द करावी आदी मागण्या आहेत.
वसईत एसटी संपाला १०० टक्के प्रतिसाद
वसई : तालुक्यात एसटी कर्मचारी बेमुदत संपावर उतरल्याने वसई विरार परिसरातील एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाºयांनी बेमुदत संप सुरु केला आहे. त्याला वसई, नालासोपारा, अर्नाळा या तीन डेपोतील १ हजार १५ कर्मचारी संपावर उतरले आहेत. त्यामुळे वसई विरार परिसरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.
एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
वाडा : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी वाड्यातील प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना दिवाळीची खरेदी करायती होती त्यांना शहराबाहेर जाणे शक्य झाले नाही. नोकरी व व्यवसायिकांचेही मोठे हाल झाले. त्यांनी प्रवासासाठी खाजगी गाड्यांचा आसरा घेतला. काहींनी तर ट्रक, टेम्पोला हात देऊन प्रवास केला.
एस.टी. बंदचा मोखाड्यात फारसा परिणाम नाही
मोखाडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी मंगळवारी मध्यरात्रीपासुन राज्यभर पुकारलेल्या एस.टी बंद आंदोलनाचा मोखाडा तालुक्यात फारसा परिणाम जाणवला नाही. ग्रामिण भागातुन मोखाडा शहराच्या बाजारपेठे मध्ये बाल गोपाळाना नविन कपडे, फटाके, आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील, गृहीणी ना रांगोळी आदी वस्तु च्या खरेदी साठी ये - जा करणाºयांनी खाजगी वाहनांचा वापर केला. तसेच चाकरमानी वर्गाची काही काळ मोठी अडचण झाली. दिवसभर चास, आसे, खोडाळा, जव्हार, मोखाडा, ञ्यंबकेश्वर आदी मार्गावर चालणाºया बसेस बंद असल्याने नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी ये - जा करण्यासाठी खाजगी वाहनाचा आधारे प्रवास करुन इच्छत स्थळ गाठले.