बोईसरमध्ये बिबट्या घुसला , वनखात्याची रात्रभर गस्त, थांगपत्ता लागलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:15 IST2017-09-07T02:15:44+5:302017-09-07T02:15:54+5:30
येथील यशवंत सृष्टीसमोरील जैन मंदिरात मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास बिबट्या शिरला व त्यामागील पत्राशेड व झाडाझुडपांमध्ये दडून बसला.

बोईसरमध्ये बिबट्या घुसला , वनखात्याची रात्रभर गस्त, थांगपत्ता लागलाच नाही
पंकज राऊत
बोईसर : येथील यशवंत सृष्टीसमोरील जैन मंदिरात मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास बिबट्या शिरला व त्यामागील पत्राशेड व झाडाझुडपांमध्ये दडून बसला.
त्याच्या आसपास बघ्यांची गर्दी होताच गांगरून तो पळून गेला. पळतांना त्याने वाटेत आलेल्या चंद्रकांत गावडे या पाणीपुरीवाल्याला आपल्या पंजाचा ओझरता फटका मारला त्यामुळे त्याच्या नखांचे ओरखडे त्याच्या शरीरावर उमटले. बोईसरच्या वन कर्मचाºयांना याची खबर मिळताच ते त्वरीत घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला पांगविले.
नंतर त्याचा जवळपास दोन तास या परिसरात शोध घेतला गेला परंतु तो सापडला नाही, तो बोईसरच्या पूर्वेला गायब झाल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाºयांनी त्या भागात रात्रभर गस्त घातली मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही.