आणि अख्ख कुटुंबचं दडल पलंगाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:29 IST2018-02-13T22:29:18+5:302018-02-13T22:29:31+5:30
सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीने कमालीचा कहर केला. अनेकांच्या संसाराची अक्षरश: राखरांगोळीच झाली.

आणि अख्ख कुटुंबचं दडल पलंगाखाली
विरुळ (आकाजी) - सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीने कमालीचा कहर केला. अनेकांच्या संसाराची अक्षरश: राखरांगोळीच झाली. सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपीटने अनेकांची घर पडली. या वादळात विरूळ येथील गजानन वानखडे यांच्या घरावरील छप्पर उडाले. छपरावरील दगड व लोखंडी रॉड घरात कोसळले. या कुटुंबाने जीव मुठीत घेवुन पलंगाचा सहारा घेत त्या खाली दडुन बसत आपला जीव वाचविला. यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रमाणात झाले. मारोतराव तेलंगे, दत्ता राजुरकर यांच्याही घरांचे छप्पर उडाले. निजामपूर, टाकळी, पिपळगाव, वडाळा, सोरटा या गावातही गारपीट व वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले. नुकसान ग्रस्तांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.