टेन्शनपासून दूर घेऊन जाणारं कनाताल हिल स्टेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 11:51 AM2018-12-21T11:51:31+5:302018-12-21T11:58:53+5:30

हिवाळ्यात भटकंती करणारे लोक फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. पण अनेकांना वेगळी आणि फार चर्चेत नसलेली पण तितकीच सुंदर ठिकाणे सहज मिळत नाहीत.

Visit less know hill station of Uttrakhand Kanatal | टेन्शनपासून दूर घेऊन जाणारं कनाताल हिल स्टेशन!

टेन्शनपासून दूर घेऊन जाणारं कनाताल हिल स्टेशन!

googlenewsNext

(Image Credit : YouTube)

हिवाळ्यात भटकंती करणारे लोक फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. पण अनेकांना वेगळी आणि फार चर्चेत नसलेली पण तितकीच सुंदर ठिकाणे सहज मिळत नाहीत. उत्तराखंडमधील कनाताल हे असंच एक सुंदर ठिकाणा आहे, ज्याबाबत फार पर्यटकांना माहिती नाही. 

हिमालयाच्या सुंदर डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या या ठिकाणावर येऊन तुम्हाला शहरातील धावपळीच्या जीवनापासून  थोडावेळ का होईना शांतता मिळेल. इथे तुम्ही तुमच्या सर्व समस्या विसरुन क्वालिटी टाइम स्पेंड करु शकता. तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल किंवा परिवारासोबत कनाताल तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्की देणार. लॉन्ग विकेंडमध्ये तुम्ही दिल्लीहून कनातालला सहजपणे पोहोचू शकता.

दिल्ली, मसूरी आणि देहरादूनहून कनातालला सहजपणे पोहोचता येऊ शकतं. येथील आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार ठरेल. जंगली फूलं, उंचच उंच झाडे, सफरचंदांच्या बागा तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना रोमांचक किंवा थरारक असं काही पसंत असेल तर ते येथून जवळच असलेल्या कोडिया जंगलातही जाऊ शकतात. या जंगलात काही प्राणी बघायला मिळू शकतात. 

तसेच सुरकंडा देवी मंदिर कनातालपासून १० किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. वेगळ्या ट्रिपचा प्लॅन करत असाल किंवा वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर कनातालला एकदा नक्की भेट देऊ शकता. 

Web Title: Visit less know hill station of Uttrakhand Kanatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.