500,000 more visitors visited in 72 hours in 2017 in Serenndipity Arts Festival-Goa | सेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली

गोवा,पणजी,डिसेंबर २०१७: सेरेन्डिपिटी आर्टस फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये सोमवार पर्यंत नोंदणीय ५०००० प्रेक्षकांनी भेट दिली.हा पणजी,गोवा यथे आयोजित परफॉर्मिंग आर्टस महोत्सवाचा फक्त तिसरा दिवस होता.महोत्सवाच्या १० अनोख्या रीतीने तयार केलेल्या आयोजन स्थळांवर कला,संस्कृती,क्यूरेटेड आर्टस्,परफॉर्मिंग आर्टस्, नृत्य, मूर्तिकला,पारंपरिक,आधुनिक आणि समकालीन नाट्य आविष्कारांचे साक्षी होण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.परफॉर्मिंग आर्टसची प्रशंसा करण्यासाठी आणि त्याच्या प्रति पुन्हा जोश भरण्यासाठी जगभरातून लोक पणजीमध्ये आले आहेत.'एसएएफ-गोवा २०१७'च्या आयोजकांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी हे दृश्य एक अनोखा अनुभव ठरले जेथे कला आणि संस्कृतीचे पारख करणारे अद्भुत आणि विस्मयकारी परफॉर्मन्सच्या जगामध्ये स्वतः:ला हरवून बसताना दिसले.पणजीमधले वातावरण उत्साहाने भारले आहे.हे 'एसएएफ-गोवा २०१७' चे दुसरे संस्करण आहे आणि हे खूपच आनंदाचे क्षण आहेत जे खरोखर अद्भुत आहेत. 
Web Title: 500,000 more visitors visited in 72 hours in 2017 in Serenndipity Arts Festival-Goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.