Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:52 PM2018-12-12T14:52:50+5:302018-12-12T15:00:20+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. 

Video: Fire in Shiv Anand Industry Complex in Thane | Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग

Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग

Next
ठळक मुद्दे वंदना सिनेमा रस्त्यावरील शिव आनंद उद्योग संकुलातील दोन गाळ्यांना अचानक आग आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आलेसुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ठाणे - ठाण्यातील चरई भागातील वंदना सिनेमा रस्त्यावरील शिव आनंद उद्योग संकुलातील दोन गाळ्यांना अचानक आग लागली आहे. ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिव आनंद उद्योग संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग आगली आहे. संकुलमध्ये असलेल्या दोन गाळ्यांना ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. 



Web Title: Video: Fire in Shiv Anand Industry Complex in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.