वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:57 AM2019-02-05T03:57:57+5:302019-02-05T03:59:17+5:30

रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे.

Traffic Police Crime and Recovery of 1.5 Crore, Criminal Investigators | वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

Next

महाड - रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख ५४ हजार ४०० रु पये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वाहने चालवणा-या १७५ अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढतोय, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे रस्ते अपघातांंसह वाहतूककोंडी देखील वाढतच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे वास्तव पुढे आले आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी व वाहतुकीवर नियंत्रण राहावे याकरिता तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग, इतर प्रमुख रस्ते, शहरे या ठिकाणी मोहीम सुरू आहे.

वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतातच, परंतु अल्पवयीन मुलांना दुचाकी देणारे बेजबाबदार पालकही मुलांच्या अपघातांना कारणीभूत असतात. अशा पालकांना पोलिसांनी जरब दाखवली आहे. वाहतूक पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात जिल्ह्यातील १७५ अतिउत्साही पालकांवर त्यांच्या मुलांना वाहने चालवण्यास दिल्या प्रकरणी कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.
याशिवाय वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहने हाकताना सिट बेल्ट न बांधणे, हेल्मेट न वापरणे आणि मोबाइलवर बोलणे, वाहनांना गॉगल काचा, सिग्नल तोडणे, धोक्याची ड्रायव्हिंग, अतिवेग, मद्यपान करून गाडी चालवणे, नो पार्किंग व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक अशा विविध प्रकारे वाहतूक नियम मोडणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे.

६ हजार २१६ जणांवर कारवाई
च्सिट बेल्ट न बांधणाºया ६ हजार २१६ जणांवर कारवाई झाली असून हे प्रमाण सर्वाधिक आहे, तर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक कारवाई केवळ १४ जणांवर झाली आहे. ही संख्या सर्वात कमी असली तर दंडात्मक वसुली सर्वाधिक म्हणजेच २० लाख झालेली आहे.

Web Title: Traffic Police Crime and Recovery of 1.5 Crore, Criminal Investigators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.