टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:34 AM2018-02-19T00:34:55+5:302018-02-19T00:35:00+5:30

ठाणे परिवहन सेवेने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आता टीएमटीच्या ताफ्यातील ५८८ पैकी सद्य:स्थितीत सुरू

TMT will get 14 crores from advertisement | टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी

टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आता टीएमटीच्या ताफ्यातील ५८८ पैकी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या ४३४ बसवर यापुढे जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. यातून ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत १३ कोटी ७२ लाख ४४ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
ठाणे परिवहन सेवेचे २०१८-१९ चे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची भाडेवाढ न करता प्रवाशांना चकाचक प्रवासाची हमी प्रथमच देण्यात आली आहे. त्यानुसार, भविष्यात ठाणेकरांना ६०० च्या आपसास बस उपलब्ध होणार आहेत. आज ठाणे महापालिकेची परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या अनुदानातून परिवहनचा गाडा बºयापैकी हाकला जात आहे. परंतु, भविष्यात पालिकेने अनुदान देणेच बंद केले, तर तो हाकायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाल्याने परिवहन प्रशासनाने आपले उत्पन्न इतर स्रोतांच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार, जाहिराती प्रसिद्ध करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या परिवहनच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये सध्या असलेल्या बस आणि भविष्यात सामील होणाºया बसचादेखील समावेश केला आहे. त्यानुसार, प्रतिबस महिनाकाठी परिवहनला सहा हजार ४३४ रुपये प्राप्त होणार आहेत. तर, व्होल्वो बसचे दर हे ३१ हजार ५०० इतके निश्चित केले आहे. त्यानुसार, ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत १३ कोटी ७२ लाख ४४ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.

Web Title: TMT will get 14 crores from advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.