ठाण्यात दोन अपघातांत ९५ वर्षीय आजीबाईसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:40 IST2018-04-14T19:40:52+5:302018-04-14T19:40:52+5:30

Three injured including Ajibai, 95 year, two accidents in Thane | ठाण्यात दोन अपघातांत ९५ वर्षीय आजीबाईसह तिघे जखमी

ठाण्यात दोन अपघातांत ९५ वर्षीय आजीबाईसह तिघे जखमी

ठळक मुद्देकंटेनरने चारचाकी कारला पाठीमागून धडक कारचेही नुकसान




ठाणे : शहरातील वेगवेगळ्या दोन अपघातांत तिघे जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका ९५ वर्षीय आजीबार्इंचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्तकनगर येथील अंबुबाई चिमुलगी (९५) या आजीबाई ११ एप्रिल रोजी आंबेडकर पुतळ्याजवळून भाजी घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डाव्या व उजव्या हाताला तसेच खांद्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी अजयकुमार यादव या चालकाविरोधात १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. आव्हाड करत आहेत. तर, दुसऱ्या घटनेत, मुंबई-नाशिक रोडवरील साकेत ब्रिजजवळ १३ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता भरधाव वेगाने जाणा-या कंटेनरने चारचाकी कारला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कल्याण, आंबिवली येथील अनिल शुक्ला (४८) आणि शेखर कदम हे दोघे जखमी झाले आहे. तसेच त्यांच्या कारचेही नुकसान झाले असून अपघाताची माहिती न देता कंटेनरचालक फरार झाला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे करत आहेत.
 

Web Title: Three injured including Ajibai, 95 year, two accidents in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.