तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:16 AM2019-05-13T05:16:10+5:302019-05-13T05:16:27+5:30

दुर्घटनेवेळी ४ हेल्पर कारखान्यात होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

 Three deaths due to poisonous air in Tarapur MIDC; The doctor who treated him was also barred | तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा

तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा

googlenewsNext

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं एन ६० मधील स्क्वेअर केमिकल या कारखान्यात रविवारी विषारी वायुमुळे तीन जणांचा मृत्यू झाला, तर जखमींवर उपचार करणा-या डॉक्टरांनाही त्याची बाधा झाल्याने त्यांनाही अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आजूबाजूचे कारखाने रिकामे केले आहेत.
रविवारी दुपारी ३.४५च्या दरम्यान कारखान्यातील आर एम २ या स्टोरेज टँकमध्ये सॉल्व्हंट भरण्याचे काम सुरू असताना, अचानक स्टोरेज टँक फाटून त्यामधून बाहेर सांडलेल्या रसायनातून निघालेला धूर व विषारी वायूची बाधा कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे (५९), आॅपरेटर दत्तात्रय घुले (२५) व हेल्पर रघुनाथ गोराई (५०) यांना झाली,
त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेवेळी ४ हेल्पर कारखान्यात होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
इतर तिघांना एमआयडीसीतील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनाही जखमींच्या कपड्यांच्या वासाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे
त्यांनाही अतिदक्षता विभागात दाखल
केले आहे. संबंधित डॉक्टरांची
नावे सांगण्यास हॉस्पिटल प्रशासनाने
नकार दिला.

Web Title:  Three deaths due to poisonous air in Tarapur MIDC; The doctor who treated him was also barred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू