ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:09 AM2018-09-03T01:09:28+5:302018-09-03T01:10:14+5:30

महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला.

Thane funding; The need to emphasize the beauty of the city | ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

Next

- अजित मांडके

ठाणे : महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला. २६ पैकी १२ प्रकल्पांचे कार्यादेश देण्यात आले. २१ प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे. मात्र प्राप्त ४५० कोटी पैकी पालिकेला केवळ ५८ कोटींचाच निधी खर्च करता आलेला आहे.
तीन महिने उलटूनही निधीचा विनियोग झाला नसल्याची माहिती उघड झाल्यानंतर राज्य शासनाने पालिकेला निधीचा तातडीने वापर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत पालिकेने केवळ सात कोटी खर्च केला होता. परिसर विकासात १० तर शहर विकासात ६ प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ठाणे स्थानक विकास (२८९ कोटी), पूर्वेकडील सॅटीस उभारणी (२६७ कोटी), तीनहात नाका ग्रेड सेपरेटर (२३९ कोटी), क्लस्टर विकास (३९७४ कोटी), लेकफ्रंट (३ कोटी), वॉटरफ्रंट (२२४ कोटी) २४ तास पाणीपुरवठा योजना, एलईडी लाईट्स (२७ कोटी), सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा (४२ कोटी) आदी महत्त्वाचे प्रकल्प आहेत.

शहर १०० टक्के वायफायने कनेक्ट केले आहे. मुख्य भागात ४५० कॅमेरे लागले आहेत. पारसिक चौपाटीचे काम सुरू झाले आहे. साकेत बाळकुम, कळवा ते शास्त्रीनगर, कोलशेत, नागला बंदर विकास, कावेसर वाघबीळ, पारसिक रेतीबंदर चौपाटी अशा २०६ कोटींच्या खाडीकिनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाची कामे सुरू झाली आहेत.

तलावांकडे लक्ष
मासुंदा, हरियाली, कमल तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी ७.१० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.
नाले बांधणे, मल:निसारण यंत्रणा यांना मान्यता मिळाली आहे.

Web Title: Thane funding; The need to emphasize the beauty of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.