अनाधिकृत बांधकाम प्रकरणातील अन्य नगरसेवकांवरही कारवाई करा, राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 18:03 IST2018-11-13T18:01:22+5:302018-11-13T18:03:31+5:30
राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर ज्या पध्दतीने कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर इतर दोषी नगरसेवकांवर सुध्दा्रकारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

अनाधिकृत बांधकाम प्रकरणातील अन्य नगरसेवकांवरही कारवाई करा, राष्ट्रवादीची मागणी
ठाणे - ठाणे महानगर पालिकेमधील अनेक नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड ) अन्वये कारवाई करण्यासंदर्भात तक्र ारी करण्यात आल्या आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करून मोरेश्वर किणी यांच्यावर ज्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने ज्यांच्या विरोधात तक्र ारीं करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर अनाधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. या सांधर्भात परांजपे यांनी निवेदनाद्वारे सर्वाना एकच नियम लागू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनानुसार, ठाणे शहरात ज्या नगरसेवकांनी अनाधिकृतपणे बांधकामे केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड ) अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच न्यायालयानेही या नगरसेवकांवर कारवाई करणे तसेच पद रद्दतेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी ज्यांच्या विरोधात तक्र ारी करण्यात आल्या आहेत, त्या नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संविधानात दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाची अंमलबजावणी करणे आयुक्तांचे काम आहे. संविधानाच्या तत्वानुसार सर्वाना समान न्याय देण्यात आला पाहिजे. याचा विचार करून आयुक्तांनी इतर नगरसेवकांवर म्हणजेच ज्यांनी अनाधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.