चित्रपटात हिरोईनच्या भूमिकेचे अमिष, अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 17:39 IST2018-08-11T17:38:03+5:302018-08-11T17:39:42+5:30
अल्पवयीन मुलीला चित्रपटात होरोईनची भूमिका देण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. तसेच अज्ञात प्रोड्युसरनेही नग्न फोटोसेशन करून अत्याचार केला.

चित्रपटात हिरोईनच्या भूमिकेचे अमिष, अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
उल्हासनगर : अल्पवयीन मुलीला चित्रपटात होरोईनची भूमिका देण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. तसेच अज्ञात प्रोड्युसरनेही नग्न फोटोसेशन करून अत्याचार केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-1 परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची ओळख मेहबूबअली मोहम्मद खान यांच्यासोबत झाली. त्याने मुलीला गोड बोलून चित्रपटात हिरोईनची भूमिका देत असल्याचे आमिष दाखविले. मुलीचा विश्वास संपादन केल्यावर डिसेंबर 2017 ते जुलै 2018 या कालावधीत मुलीला ठाणे, मुंबई आदी ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच मेहबूबअलीच्या एका अनोळखीच्या प्रोड्युसरने, मुलीचे नग्न फोटो काढून जबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, 31 जुलै रोजी मुलीचे अपहरण केले. याप्रकणामुळे भयभीत झालेल्या मुलीने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. पीडित मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून, मुलीसोबत झालेल्या सर्व प्रकारची माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर पोलीस सध्या मेहबूबअली खान व अज्ञात प्रोड्युसरचा शोध घेत आहेत.