कार्यक्रमाचा रिअल टाईम आणि इमोशनल टाईम लक्षात ठेवावा : डॉ. आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:14 PM2019-05-02T13:14:07+5:302019-05-02T13:18:03+5:30

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ आयोजित कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेण्यात आली.

Remember the program's real-time and emotional time: Dr. Anand Nadkarni | कार्यक्रमाचा रिअल टाईम आणि इमोशनल टाईम लक्षात ठेवावा : डॉ. आनंद नाडकर्णी

कार्यक्रमाचा रिअल टाईम आणि इमोशनल टाईम लक्षात ठेवावा : डॉ. आनंद नाडकर्णी

Next
ठळक मुद्देकार्यक्रमाचा रिअल टाईम आणि इमोशनल टाईम लक्षात ठेवावा : डॉ. आनंद नाडकर्णीअत्रे कट्टय़ावर डॉ. नाडकर्णी यांची बहुरंगी बुद्धी या विषयावर मुलाखत घेतली ज्येष्ठांसाठी विनामूल्य उपक्रम आयोजित केले जातात

ठाणो: आयोजन व संयोजनामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रम डोळ्य़ांसमोर घडताना दिसला पाहिजे. जोर्पयत तो घडताना दिसत नाही तोर्पयत कार्यक्रमाचे संयोजन हे कागदावरच दिसते. कार्यक्रमाचा रिअल टाईम आणि इमोशनल टाईम लक्षात ठेवावा. इमोशनल टाईममुळे रिअल टाईम हा कसा गेला हे कळत नाही. या दोन्ही टाईमची सांगड घालणो आवश्यक आहे. कार्यक्रम डोळ्य़ांसमोर वारंवार आणावा असे मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले.       अत्रे कट्टय़ावर डॉ. नाडकर्णी यांची बहुरंगी बुद्धी या विषयावर कट्टय़ाच्या संपदा वागळे यांनी मुलाखत घेतली.

      यावेळी नाडकर्णी यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. कार्यक्रमाचे नेटके आयोजन कसे करता यावर बोलताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, अथच्या आधी आणि इतिच्यानंतर कार्यक्रम आणला पाहिजे, मग त्या कार्यक्रमातील स्थीर गोष्टी डोळ्य़ांसमोर आणाव्या. त्यामधील जड आयोजन पुर्ण होते. यावेळी त्यांनी आपल्याला गाणी कशी सुचतात याबद्दल सांगितले. हिमयात्र करताना आलेले अनुभव कथन करताना त्यांनी लिहीलेली ‘प्रिय स्पीती’ ही कविता वाचून दाखविली. त्यानंतर त्यांच्या अंगी असलेले तबलावादनाचे कौशल्याबद्दल सांगताना भविष्यात नाल, घटम शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 27 वर्षे रांगेने आम्ही सगळे डॉक्टर त्यात संगीतकार, गायक आहेत त्यांनी मेडीकल ऑर्केस्ट्रा केला आणि मी निवेदनाची बाजू सांभाळत होतो. त्या ऑर्केस्ट्रामध्ये मराठी भावगीतांचा कार्यक्रम केला, आता सध्या तो कार्यक्रम करीत नाही. स्वच्छंद कार्यक्रमामुळे मराठी कवितेबरोबर माझा गहिरा संबंध राहिला आहे असे ते म्हणाले. यावेळी ठाणो प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ असलेल्या सप्तसोपान डे केअर सेंटरबद्दल सांगताना ते म्हणाले, या ठिकाणी वेगवेगळ्य़ा विषयांवरील प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी पुढील महिन्यात व्यसनाधिनतेत अडकलेल्या पुरुषांच्या पत्नींसाठी सुरू असलेले सहचरिण किचन स्थलांतरीत केले जाणार आहे. ज्येष्ठांच्या ज्येष्ठत्वाला सलाम म्हणून या ठिकाणी ज्येष्ठांसाठी विनामूल्य उपक्रम आयोजित केले जातात त्याचा ज्येष्ठांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, या ठिकाणी ग्रंथालय असून त्यातील पुस्तके विनामूल्य वाचनासाठी असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी त्यांच्या प्रार्थनेने केला. शीला वागळे यांनी आभार प्रदर्शन केले. 
 

Web Title: Remember the program's real-time and emotional time: Dr. Anand Nadkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.