वेश्या व्यवसाय चालवणारा पंडित गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:33 IST2018-04-05T06:33:49+5:302018-04-05T06:33:49+5:30

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका ३४ वर्षीय पंडिताला अटक केली आहे. तीन पिडीत तरूणीची सुटका केली असून पंडिताला सहकार्य करणा-या महिला दलालाचा पोलीस शोध घेत आहेत.

Prostitute businessman junkyard | वेश्या व्यवसाय चालवणारा पंडित गजाआड

वेश्या व्यवसाय चालवणारा पंडित गजाआड

मीरा रोड - वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका ३४ वर्षीय पंडिताला अटक केली आहे. तीन पिडीत तरूणीची सुटका केली असून पंडिताला सहकार्य करणा-या महिला दलालाचा पोलीस शोध घेत आहेत.
मीरा रोडच्या शांतीपार्कपरिसरात राहणारा पंडित एका महिलेच्या मदतीने वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना मिळाली. एका बोगस ग्राहकाद्वारे दलालाशी संपर्कसाधून तीन मुलींचा व्यवहार पक्का केला.
२० ते २२ वयोगटातील तरु णींना घेऊन त्यांना मीरा रोड परिसरातील शांतीपार्क येथील बालाजी हॉटेलजवळ बोलवले. सोमवरी सायंकाळी पंडित या मुलींना घेऊन आला असता बोगस ग्राहकाने पंडितकडे पैसे दिले. पोलिसांनी पंडितला पैशासह ताब्यात घेतले. पंडितकडे विचारणा केली असता महिला दलालाशी ओळख झाली असून या महिलेसोबत व्यवसायात सहभागी झाल्याचे कबूल केले.

Web Title: Prostitute businessman junkyard