गरिबांच्या चुलीलाही भाववाढीची झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:25 AM2018-09-01T04:25:27+5:302018-09-01T04:26:21+5:30

रॉकेल महागले : गॅस दरवाढीने मध्यमवर्गीय होरपळले , जिल्ह्यात पावणेदोन लाख कुटुंबांना झळ

Poor chillies also give rise to inflation | गरिबांच्या चुलीलाही भाववाढीची झळ

गरिबांच्या चुलीलाही भाववाढीची झळ

Next

ठाणे : इंधन दरवाढीचा फटका केवळ डिझेल-पेट्रोल अथवा गॅसधारकांनाच बसला नसून त्याचा फटका आता गरिबांच्या चुलीलाही बसला आहे. रॉकेलवर स्वयंपाक करणाऱ्या गरिबांना अवघ्या दोन महिन्यांत चार वेळा भाववाढीला सामोरे जावे लागले आहे. आधीच शिधापत्रिकेवर कमी रॉकेल मिळत असल्याने सतत वाढणाऱ्या भाववाढीने जगायचे कसे, असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला असून यालाच अच्छे दिन म्हणायचे का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

मोदी सरकारने प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात गॅस देण्याचे वचन दिले आहे. मात्र, गॅसच्या दरात वाढ होत असल्याने मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. या इंधन भाववाढीचा फटका केवळ वाहनचालक अथवा मध्यमवर्गीयांनाच बसला नाही, तर कष्टाचे जगणे जगत असलेल्या दारिद्रयरेषेखालील आणि हातावर पोट भरणाºयांनाही बसला आहे. ज्यांच्याकडे गॅसजोडणी नाही, त्यांना शासनाकडून महिन्याला मिळणाºया रॉकेलवर चूल पेटवावी लागत आहे. मात्र, त्यांना पुरवठा केल्या जाणाºया रॉकेलच्या दरातही सतत भाववाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल चार वेळा दरवाढ झाल्याची बाब समोर आली आहे. गरिबांना अत्यावश्यक वस्तूंची भाववाढ स्थिर ठेवणे सरकारचे काम असताना सध्याचे सरकार हे भाववाढ स्थिर ठेवण्यात अपयशी झाल्याचे दिसत आहे.

शिधावाटप विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ते आॅगस्ट महिन्यांत सतत चार वेळा भाववाढ झाली आहे. शासनाकडून गरिबांना मिळणाºया रॉकेलच्या दरात प्रतिलीटरमागे एक रु पयाची वाढ झाली आहे. ५ जुलै रोजी २५.८९ दराने विकले जाणारे रॉकेल २० जुलैपर्यंत २६.१५ रु पये प्रतिलीटर दरापर्यंत पोहोचले होते. ३ आॅगस्ट रोजी हा दर २६.४१ रु पयांवर पोहोचला होता. त्यानंतर, सुमारे १५ दिवसांनी म्हणजे २० आॅगस्ट रोजी त्यात वाढ होऊन ती ६२.६७ रु पयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ अवघ्या १५-१५ दिवसांनी गरिबांच्या रॉकेलचा भाव वाढतो आहे. ही दरवाढ केवळ दोन महिन्यांचीच नसून गेल्या काही महिन्यांत ती सतत वाढतेच आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ठाणे शहरात दारिद्रयरेषेखालील (पिवळे) एकूण ७०२, अंत्योदय (केशरी) एक लाख ६३ हजार ५९३ कार्डधारक आहेत.
च्तसेच दरमहिन्याला एका प्रौढ व्यक्तीला दोन लीटर, तर दोघांना तीन लीटर तसेच तीनपेक्षा जास्त व्यक्तींना चार लीटरच रॉकेल मिळते. या दरवाढीमुळे आम्ही जगायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Poor chillies also give rise to inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.