पोलिसांनी उतरवली ५०३ तळीरामांची झिंग, ठाण्यात सर्वाधिक २५८ केसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:55 AM2019-03-22T03:55:07+5:302019-03-22T03:55:23+5:30

होळी आणि धुळवडीला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत ५०३ तळीरामांची झिंग उतरवण्यात आली.

 Police discharged 503 cases of Tali Ram, maximum 258 cases in Thane | पोलिसांनी उतरवली ५०३ तळीरामांची झिंग, ठाण्यात सर्वाधिक २५८ केसेस

पोलिसांनी उतरवली ५०३ तळीरामांची झिंग, ठाण्यात सर्वाधिक २५८ केसेस

Next

ठाणे - होळी आणि धुळवडीला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत ५०३ तळीरामांची झिंग उतरवण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २५८ केसेस ठाणे विभागात नोंदवल्या आहेत. त्यांचे वाहनपरवाने आणि वाहने जप्त केली असून ती सोडवण्यासाठी त्यांना न्यायालयात जावे लागणार आहे.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात या मोहिमेसाठी ५४ पथके तैनात केली होती. या पथकांनी मुख्य चौकांसह येऊर व उपवन या परिसरांत तपासणी केली. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत गुरुवारी सायंकाळपर्यंत ५०३ मद्यपींची झिंग उतरवण्यात आली. यामध्ये ठाणे विभागात सर्वाधिक २५८ जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ कल्याण-९०, भिवंडी-८२ आणि उल्हासनगर या विभागात ७३ मद्यपींना पकडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता वाहन परवान्यांसह त्यांची वाहनेही जप्त केली. न्यायालयात त्यांना दोन किंवा तीन हजार रुपयेही इतका दंड होऊ शकतो. वेळप्रसंगी त्यांना एक किंवा दोन अथवा सहा दिवस तथा त्यापेक्षा जास्तही कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर नुकत्याच सुरू झालेल्या ई-चलन प्रणालीमुळे पकडलेल्या वाहनधारकांची माहिती त्या प्रणालीत अपलोड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहनधारकांचे वाहनपरवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

मीरा-भार्इंदरमध्ये २३ मद्यपी, २३७ बेशिस्त चालकांवर कारवाई

मीरा रोड - धुळवडीनिमित्त मद्यपान करून तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या २६० जणांवर मीरा-भार्इंदरमध्ये पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. नाकाबंदीत मद्यपान करून वाहन चालवणाºया २३ मद्यपी चालकांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

धुळवडीनिमित्त मद्यपान करण्यासह बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांसह आठ प्रमुख ठिकाणी नाकाबंदी केली होती. उत्तन व गोराईच्या समुद्रकिनारी जाणाºयांची संख्या मोठी असल्याने या मार्गावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते.

२३ मद्यपी वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २३७ जणांवर कारवाई केल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितले. त्यांच्याकडून ४७,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरु होती.
 

Web Title:  Police discharged 503 cases of Tali Ram, maximum 258 cases in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे