जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या वेळकाढू व दुर्लक्षितपणामुळे पाणी टंचाईवरील उपाययोजनेचे साडेसात कोटी कागदावरच; महिलांची पाण्यासाठी भटकंती

By सुरेश लोखंडे | Published: February 4, 2019 08:37 PM2019-02-04T20:37:56+5:302019-02-04T20:44:12+5:30

* जिल्ह्यातील तालुक्यांमधील पाणी टंचाईग्रस्ते गावे व पाडे आणि त्यावरील खर्चा नियोजन खालील प्रमाणे तालुका गावे पाडे निधीची तरतूद अंबरनाथ १२ ४४ ४१ लाख कल्याण १० ३६ एक कोटी १६ लाख भिवंडी ०९ ११० ६९ लाख ८४ हजार मुरबाड ४३ ७९ एक कोटी ३३ लाख शहापूर १२१ ३०३ तीन कोटी ८२ लाख

With over 75 million papers on water scarcity measures, due to timely and ignorance of Zilla Parishad with district administration; Wandering water for women | जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या वेळकाढू व दुर्लक्षितपणामुळे पाणी टंचाईवरील उपाययोजनेचे साडेसात कोटी कागदावरच; महिलांची पाण्यासाठी भटकंती

शहापूर तालुक्यासाठी सुमारे तीन कोटी ८२ लाख रूपयांचा कृती आराखडा मंजूर आहे. पण तो केवळ कागदावर ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन ग्रामस्थांचा अंत पहात असल्याचे ऐकायला मिळत आहे

Next
ठळक मुद्देउपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने सात कोटी ४२ लाख रूपये खर्चाचे नियोजनविहिरी खोल करण्यासह टँकर - बैलगाडीने पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठ्याची दुरूस्तीपुरक योजना, नवीन विधन विहिरी आदींची कामे हाती घेण्याचे नियोजन

सुरेश लोखंडे

ठाणे : ग्रामीण,आदिवासी आणि दुर्गम भागातील पाणी टंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रूपये मंजूर आहे. त्याव्दारे युध्दपाळीवर कामे करून उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. मात्र जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या वेळकाढू व दुर्लक्षितपणामुळे डोंगराळ, दुर्गम भागात महिलां पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यातील आदिवासी गावपाड्यात दिसून येत आहे.
       ठाणे, मुंबईच्या महानगररांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात तर नोव्हेंबरपासून टंचाईच्या झळा सुरू आहेत. त्याकडे लोकमतने प्रशासनाचे सतत लक्ष वेधले. नुकतेचे ८ व २८ जानेवारीला देखील वृत्तप्रसिध्द करून प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. यास अनुसरून हालचाली सुरू झाल्या. मात्र ठोस उपाययोजना हाती घेण्याऐवजी बोरिंगची कामे देखील निविदेच्या चक्र व्युहात टंचाईची कामे आडकल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील नेहमीप्रमाणे पाणी टंचाईवरील आढावा घेऊन नेहमीच्या सुरात अधिकाºयांना कारवाईच्या सुचना केल्या. मात्र रविवारी शहापूरच्या दुर्गम भागात फेरफटका मारून जीव घेण्या पाणी टंचाईला ग्रामस्थ तोंड देत असल्याचे वास्तव दिसून आले.
       सध्यास्थितीला तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या शहापूर तालुक्यासाठी सुमारे तीन कोटी ८२ लाख रूपयांचा कृती आराखडा मंजूर आहे. पण तो केवळ कागदावर ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन ग्रामस्थांचा अंत पहात असल्याचे ऐकायला मिळत आहे. शहापूर तालुक्याच्या १२१ गावांसह ३०३ पाड्यांमध्ये पाणी टंचाईवरील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी सुमारे तीन कोटी ८२ लाखांच्या खर्चाचे नियोजन आहे. पण अजून या उपाययोजना कागदावरच रेंगाळत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे टाकीपठार, डोळखांबच्या पठारावरील गावे, तलवाडा ग्राम पंचायतीचे गावे, चिंचचवाडी, कोठारे, कळगोंडे आदी गाव परिसरात तीव्र टंचाईला ग्रामस्थ तोंड देत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ भागरत यांनी निदर्शनात आणून दिले.
       याप्रमाणेच कवठेपाडा, कुंडाची वाडी, रिकामवाडी, आवळे,जांभूळपाडा,साखरबाव, दलालपाडा, ठुणे खुर्द, सिंधीपाडा, किन्हवली जवळील कानवे, जरोली, खरांगण, शोगाव, धोंडाळपाडा, धानकेपाड, सावरोली, नांदगांव आदी गावपाडे टंचाईने त्रस्त असल्याचे स्थानिक ग्रामस्थ भगवान दवणे यांनी सांगितले. या गावपाड्याप्रमाणेच ठुणे येथील दवणे यांनी डोळखांब भागातील सावरपाडा, निभाळपाडा, सुखांडे, डोहले, देहने,वरपडी, पाचघर, रसाळपाडा, नेटवाडी, उंबाचापाडा, खरीवली, नडगांव आदी पाड्यांचे वास्तव दवणे यांनी निदर्शनात आणून दिले. शेंद्रुणजवळील निचितेपाडा, पष्टे, भटपाडा, निपुर्ते, टेंभा आदींसह डोळखांबजवळील तोरणपाडा,चांदीचा पाड, आदीं गावखेडे तीव्र टंचाईने त्रस्त आहेत.

        मुरबाड तालुक्यातील तोंडली, सासणे, म्हाडस, भूवन, वज्रेची वाडी, पाटगांव, वाल्हीवरे या गावांप्रमाणेच धसई परिसरातील खिरवाडी, दांडवाडी, मोखवाडी, तावरेवाडी या पाड्यांमधील ग्रामस्थ पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याशिवाय टोकावडे परिसरातील जंगलपट्यात वाघवाडी, उंबरवाडी, आवळ्याचीवाडी, फांगणे, खदगी, फांगूळ, गव्हाण, भूतांडडोह या ठिकाणी ग्रामस्थ पाणी समस्येने मेटाकुटीला आले आहेत. या गावांमधील महिला, मुलींसह ग्रामस्थ पाण्याच्या शोधात भंटकती करीत रानावनात फिरत आहेत.पायवाटेने अनवाणी फिरत असलेल्या या महिलांकडून जंगलातील पाणवट्यांच्या डबक्यातून पाणी भरत आहेत. विहिरी कोर्या पडलेल्या आहेत. तासनतास या विहिरींवर बसून त्यात साठलेले पाणी त्यांना काढावे लागत आहेत.

      जिल्ह्यातील १९५ गावे आणि ५७२ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांना तीव्र पाणी टंचाई उद्भवणार असल्याचा अहवाल असतानाही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याचे ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शहापूर तालुक्यातील असून ही त्यांचे देखील या आदिवासी, ग्रामीण, दुर्गम भागातील पाड्यांच्या टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दवणे यांनी सांगितले.पाणी टंचाईवरील वेळीच उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने सात कोटी ४२ लाख रूपये खर्चाचे नियोजन केले आहे. त्याव्दारे विहिरी खोल करण्यासह टँकर - बैलगाडीने पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठ्याची दुरूस्ती, पुरक योजना, नवीन विधन विहिरी आदींची कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे वर्षानुवर्ष पाणी टंचाई उद्भवत आहे.           दरवर्षी कोटीच्या कोटी खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवत आहे. गेल्या वर्षी १२१ मोठे गावे आणि ३२७ पाड्यांनी पाणी समस्येला तोंड दिले. यंदा ही १९५ गावे आणि ५७२ पाडे पाणी टंचाईच्या चक्रव्युहात आहेत.
पाणी टंचाईच्या या गांवपा्यांपैकी ८८ गावे अािण २३० पाड्यांना एक कोटी ३५ लाख रूपये खर्चुन टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजनही आहे. पण त्यानुसार अजूनही पाणी पुरवठ्याची कामे सुरू नाही. शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे, १८३ पाड्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक कोटी पाच लाखांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात १८ गावे व ३३ पाड्यांना टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. त्यावर २१ लाख ७६ हजार रूपये खर्च होतील. यानंतर भिवंडीला तीन गावे सहा पाडे आणि अंबरनाथला दोन गावे आठ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा होईल.
          विहिरी खोल करण्यासाठी १८ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरच्या ३० गावांसह ६३ पाड्यांच्या विहिरी खोल होतील. नळपाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी २२ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरचे सहा गावे, सहा पाड्यांसाठीह एक कोटी ५४ लाखांच्या खर्चा नियोजन आहे. तर मुरबाडमधील पाच गावे आणि एक पाड्यासाठी ५८ लाखां मंजूर आहे. चार गावे आणि दोन पाड्यांना पुरक पाणी पुरवठा योजना होईल. त्यासाठी एक कोटी ६८ लाखांचे नियोजन केले. नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी ९८ लाखांचा खर्च निश्चित केला. त्यातून ६२ गावे आणि २३९ पाड्यांना विंधन विहिरी (बोरवेल) तयार करण्याचे निश्चित आहे. यापैकी सर्वाधिक मुरबाड तालुक्यामधील २० गावे ४४ पाड्यांना ३८ लाख ४० हजारांचे नियोजन. तर शहापूरच्या १८ गावांसह ५० पाड्यांवर ४० लाख ८० हजार रूपये खर्च मंजूर आहे.
 

Web Title: With over 75 million papers on water scarcity measures, due to timely and ignorance of Zilla Parishad with district administration; Wandering water for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.