आॅनलाइन गंडा घालणारे सहा नायजेरियन पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:39 AM2018-04-05T06:39:14+5:302018-04-05T06:39:14+5:30
परदेशात नामांकित कंपनीत नोकरी लावतो, तसेच लग्नाचे आमिष दाखवून पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आॅनलाइन गंडा घालणाऱ्या विविध गुन्ह्यांतील सहा नायजेरियन्सच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ठाणे - परदेशात नामांकित कंपनीत नोकरी लावतो, तसेच लग्नाचे आमिष दाखवून पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आॅनलाइन गंडा घालणाऱ्या विविध गुन्ह्यांतील सहा नायजेरियन्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या वाढत्या आकडेवारीमुळे नायजेरियन हे डोकेदुखी झाल्याने वेळीच त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी मोहीम राबवण्याची गरज असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकाला अमेरिकेत नोकरी लावतो, असे सांगून एका नायजेरियनने ३० लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी नालासोपाºयातून त्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मागील पाच महिन्यांत अशाप्रकारच्या काही गुन्ह्यांत पाच जणांना अटक केली आहे. ही मंडळी पाठवलेल्या ई-मेलला जे प्रतिसाद देतात,त्यांचा हळूहळू विश्वास संपादन करून त्यांच्याकडून अमुकतमुक कामासाठी पैसे मागून फसवणूक करत असल्याचे क ाही प्रकार पुढे आले आहेत. एका गुन्ह्यात दोन तर महिलांवर तुरुंगात जाण्याची वेळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नायजेरियनमध्ये दाऊदचे वलय
नायजेरियन नागरिकांवर पोलीस कारवाईची वेळ येते. तेव्हा दाऊद नावाचा एक इसम त्यांना सोडवण्यासाठी धावून येतो,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.त्यामुळे त्यांच्यात दाऊद नावाचे वलय असल्याचे दिसते.
लुबाडलेला पैसा येथेच खर्च करतात
ही मंडळी लुबाडलेला पैसा हा भारतातच विविध वस्तूंच्या खरेदीवर करून त्या त्यांच्या देशात नातेवाइकांना पाठवतात. यामुळे एखाद्या गुन्ह्यात जरी अटक झाल्यावर त्यांच्याकडे कोणताही मुद्देमाल मिळत नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्याच्या पदरी निराशाच येते.
शिक्षणाच्या नावाने देशात येतात.
गंडा घालणारे नायजेरियन शिक्षणासाठी येत असलेतरी त्यांना रस नसून फक्त पैसे कमवणे, हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे नापास झाल्यावर ते तेथे राहण्याची मुदत वाढून घेतात.त्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस पासपोर्ट घेतात.त्यामुळे वास्तव्यासाठी त्यांना आणखी कालावधी मिळतो.त्यामुळे गुन्हे दाखल होण्यास ते घाबरत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चॅटिंगद्वारे संपर्क साधतात
ई-मेल करून ते नागरिकांना आमिष दाखवतात. कोणाशीही ते मोबाइल फोनद्वारे संपर्क न साधता फक्त चॅटिंग करून अमुकतमुक बँक खात्याचे नंबर देऊन फसवणूक क रतात. जरी व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला तरी, ते त्यामध्ये कसा अडथळा येईल, हे पाहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घरमालकांनी
काळजी घ्यावी
नायजेरियन लोकांना भाडे घरे देणाºयांनी ते कशासाठी आले आहेत,ते काम करतात, याचा मागोवा घेतला पाहिजे. पण,मालक मागोवा घेत नसल्याने त्यांचे फावते.त्यातून ते आपले हातपाय पसरवतात. त्यामुळे घरमालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवूनत्यांचा पासपोर्ट,व्हिसा तपासावा. तसेच ज्या उद्देशाने आले आहेत,त्याची माहिती घ्यावी.जर का त्याचा उद्देश वेळेत पूर्ण होत नसल्याचे दिसून लागल्यास त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी दिली.