नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 05:06 IST2018-12-02T05:06:40+5:302018-12-02T05:06:42+5:30

नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे (३८) हे हरिनिवास सर्कल येथून घरी जात होते.

Naupada police station's assistant police inspector beat up | नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे (३८) हे हरिनिवास सर्कल येथून घरी जात होते. याचदरम्यान रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी ते गेले असता, त्यांना धक्काबुक्की करून मारहाण झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी महेश शेट्टी आणि वैकुंठनाथ जयस्वाल यांना अटक केली.
महेश अनोळखी व्यक्तीला मारहाण करत होता. त्यावेळी मोरे तेथे गेले. आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितल्यावर महेशने त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की के ली. त्यांच्या हातांवर नखे मारली. महेशला पोलीस सहकाºयांच्या मदतीने सरकारी वाहनात बसवताना त्याचा साथीदार वैकुंठनाथने मागून येऊन मोरेंनाठोशाबुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: Naupada police station's assistant police inspector beat up