थर्टी फर्र्स्टसाठी नव्वदीतील हेअर स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:55 AM2018-12-28T04:55:51+5:302018-12-28T04:56:07+5:30

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. सेलिब्रेशन पार्टीसाठी आकर्षक लूक असण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे अर्थात सलूनमध्ये तरुणाईची पावले वळली आहेत.

 Native hair style for ThirtyFrust | थर्टी फर्र्स्टसाठी नव्वदीतील हेअर स्टाइल

थर्टी फर्र्स्टसाठी नव्वदीतील हेअर स्टाइल

Next

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. सेलिब्रेशन पार्टीसाठी आकर्षक लूक असण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे अर्थात सलूनमध्ये तरुणाईची पावले वळली आहेत. यात हेअर स्टाइल, हेअर कट, हेअर कलर, ट्रेण्डी बीअर्ड करण्यावर त्यांचा भर आहे. नव्वदच्या दशकातल्या हेअर स्टाइल पुन्हा नव्या रूपात पाहायला मिळत आहे. या हेअर स्टाइलकडे तरुणीही आकर्षित झाल्या असून पार्टीसाठी त्यांनी या हटके हेअर स्टाइलला पसंती दिली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. १५ दिवसांपासूनच सेलिब्रेशनच्या योजना आखण्यास सुरुवात झाली होती. दिवस जवळ येत होता, तसे युद्धपातळीवर बेत आखले जाऊ लागले. यावेळेस वीकेण्डला थर्टी फर्स्ट न येता सोमवारी आल्याने बहुतांशी तरुणाईने शुक्रवार रात्रीपासूनच सेलिब्रेशन करण्याचा प्लान केला आहे.
तीन दिवस आधीच साजरे करणारे हे मुंबईच्या बाहेर जाण्यास सज्ज झाले आहे. काही जण आपल्या इमारतीच्या गच्चीवर, कोणी एखादे हॉटेल, काही जण पबमध्ये तर काही फार्म हाउसवर करणार आहेत. जसे एकीकडे प्लानिंग केले जात होते, तसे दुसरीकडे आपला लूक हटके असावा, याकडे तरुणाई लक्ष देत आहे.

हे कट आहेत तरुणाईची पसंती
यंदाच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी नव्वदच्या दशकातील हेअर स्टाइलला पसंती दिली जात आहे. यात मुलींचा कल सिक्स्टीज फ्लिप कट, स्पायकी पिक्सी, हाय अ‍ॅण्ड टाइट पोनी, सुपर ब्लण्ट बॉप तर हेअर कटमध्ये स्ट्राँग बॉब, कर्ली फ्रिंच, अण्डर कट, दी शॅक याकडे वळत आहेत.
मुलांमध्ये क्विथ, स्पाइकी क्विफ, कर्ली क्रॉप, आयब्रो कट, क्रू कट या हेअरकटचा तर पोनीटेल, मॅनबन, डेडलॉक, टॉप नॉट या हेअर स्टाइलचा बोलबाला आहे, अशी माहिती हेअर स्टायलिस्ट रुशील मोरे यांनी दिली.
रिच मोका हायलाइट्स, शॅडो रुट्स, वायब्रण्ट रेड, बालियाच, कुल अ‍ॅश हेअर या प्रकारांच्या हेअर कलरला तरुणतरुणी पसंती देत आहेत. कुल अ‍ॅश हेअर हा हेअर कलर तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे.
जसे हेअर स्टाइल करून आपला लूक बदलण्याकडे तरुणाई वळत आहे, तसे दाढी कोरण्याचा ट्रेण्डही तरुणाईमध्ये यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

गोपी स्टाइल ही दाढीच्या डिझाइनमध्ये जास्त प्रचलित झाली आहे. त्यामुळे तरुण मुले या स्टाइलकडे वळत आहे. थिक बीअर्ड, फेडेड बीअर्ड हे दाढीचे प्रकार असून दाढी कोरण्याच्या डिझाइन्सही आहेत. त्यात पूर्वीचा ट्रेण्ड नव्या रूपात आला आहे. सॉल्ट अ‍ॅण्ड पिपर, लाइन आॅक्स यासारखे डिझाइन्स आहेत, असे रुशील यांनी सांगितले.

Web Title:  Native hair style for ThirtyFrust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे