जात पडताळणी समितीच्या निर्णयाने मनपातील नगरसेवकाचे पद होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:51 PM2017-11-26T12:51:14+5:302017-11-26T12:51:53+5:30

भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवक मोह.अरशद मो.असलम अन्सारी यांनी निवडणूकी दरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे.

Municipal Councilor's post will be canceled due to the decision of the caste verification committee | जात पडताळणी समितीच्या निर्णयाने मनपातील नगरसेवकाचे पद होणार रद्द

जात पडताळणी समितीच्या निर्णयाने मनपातील नगरसेवकाचे पद होणार रद्द

Next

भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक मोह. अरशद मो. असलम अन्सारी यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे.
महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणूकीत नागाव वॉर्ड क्र.४ मधून काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अरशद मोहम्मद असलम अंन्सारी यांनी ओबीसीच्या राखीव जागेवर निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते निवडून आले होते.

मात्र जात पडताळणीचा दाखला कोकण भवन कार्यालयांत प्रलंबीत होता. त्याच वेळी निवडणूकीतील त्यांचे विरोधक डॉ.नुरूद्दीन निजामुद्दीन अंंन्सारी यांनी १२जुलै २०१७ रोजी कोकण भवन येथील जात पडताळणी समितीकडे अरशद अन्सारी यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार समितीने पाच वेळी सुनावणी घेतली. परंतु योग्य कागदपत्रे सादर करून न शकल्याने समिती अध्यक्ष उदय जाधव,सदस्य बाळासाहेब सोळंकी व सदस्य सचीव सलिमा तडवी यांनी अशरद अन्सारीचा जातीचा दाखला रद्दबातल ठरविला आहे.

या आदेशाची प्रत जातपडताळणी समितीने उपविभागीय अधिकारी व महानगरपालिकेला पाठविली आहे.त्यानुसार पालिका आयुक्त अशरफ अन्सारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.सध्या पालिका आयुक्त योगेश म्हसे हे परदेशांत गेल्याने ते आल्यावर हा निर्णय होणार आहे.दरम्यान शहरांतील नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे.
 

Web Title: Municipal Councilor's post will be canceled due to the decision of the caste verification committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.