दोन नवजात अर्भके आढळली मुंब्य्रातील घटना

By Admin | Updated: January 23, 2017 05:35 IST2017-01-23T05:35:46+5:302017-01-23T05:35:46+5:30

मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी दोन नवजात अर्भके आढळल्याने खळबळ उडाली. डायघर

Mumbra incident found in two newborn infants | दोन नवजात अर्भके आढळली मुंब्य्रातील घटना

दोन नवजात अर्भके आढळली मुंब्य्रातील घटना

मुंब्रा : मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी दोन नवजात अर्भके आढळल्याने खळबळ उडाली.
डायघर गावाजवळील रस्त्याच्या बाजूच्या झाडामध्ये आणि मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील दत्तवाडी परिसरातील गरीब नवाज इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर या मुलांना सोडून देण्यात आले होते. दत्तवाडीत सोडलेल्या मुलांच्या अंगाला सर्वत्र मुंग्या डसत होत्या. त्यामुले ते मूल रडत होते.
उपचारांसाठी दोन्ही मुलांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शीळ-डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात अर्भक सोडून देणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही परिसरातील सीटीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस मुलांना सोडून देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mumbra incident found in two newborn infants