भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:13 AM2018-09-29T07:13:28+5:302018-09-29T07:13:43+5:30

उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.

 Mayor of Pancham Kalni Ulhasnagar, BJP's fifth | भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

Next

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे. आधीच आमदारकी मिळविलेल्या कलानी कुटुंबाने आता महापौरपदही काबीज करून उल्हासनगरातील आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे.
उल्हासनगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. भाजपा-ओमी टीमची सत्ता घालविण्यासाठी साई पक्षातील फुटीर गटाच्या उमेदवार ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपाचे नगरसेवक भाजपासोबत गेले. फुटीर गटातील शेरी लुंड आणि कांचन लुंड यांनीही ऐनवेळी भाजपाची वाट धरल्याने शिवसेनेची कोंडी झाली. त्यामुळे फुटीर गटातील नगरसेवकांनी निवडणुकीतून माघार घेत स्वगृही जाणे पसंत केले.
एकूणच परिस्थिती विचारात घेऊन शिवसेनासमर्थक आणि साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी महापौरपदाचा अर्ज मागे घेतला. भाजपाच्या डमी उमेदवार डिम्पल ठाकूर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पंचम कलानी यांची बिनविरोध निवड जाहीर केली गेली.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचे पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांनी महापौरपदी पंचम कलानी यांचे नाव घोषित करताच कलानी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. हा विजय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.

Web Title:  Mayor of Pancham Kalni Ulhasnagar, BJP's fifth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.