पांढरा हत्ती म्हणून कोंडदेव क्रीडागृहाची ओळख पुसली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:46 AM2019-02-05T03:46:07+5:302019-02-05T03:46:39+5:30

मागील कित्येक वर्षे असलेली दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख आता पुसली गेली असून या स्टेडिअमला आता सुगीचे दिवस येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

The identity of the Dadoji Kondadeo sportshouse Thane | पांढरा हत्ती म्हणून कोंडदेव क्रीडागृहाची ओळख पुसली

पांढरा हत्ती म्हणून कोंडदेव क्रीडागृहाची ओळख पुसली

Next

ठाणे  - मागील कित्येक वर्षे असलेली दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख आता पुसली गेली असून या स्टेडिअमला आता सुगीचे दिवस येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मराठी कलाकारांचे सेलिब्रेटी लीग संपत नाही, तोच सोमवारपासून या स्टेडिअममध्ये आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. यानंतर बंगळुरू, चेन्नई आणि आयपीएलचालकांनी जाहिरातीसाठीसुद्धा या क्रीडागृहाची मागणी केली आहे. शिवाय, पुढील वर्षी याच स्टेडिअमवर रणजी सामन्यांच्या आयोजनासाठी पालिकेने पावले उचलली असल्याने येत्या काळात आंतरराष्टÑीय पातळीवर जाण्यासाठी ते आता सज्ज झाले आहे.
सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स संघातील रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, उन्मुख चंद, अभिषेक नायर यांच्यासह विविध संघांतून रणजी सामने खेळणाऱ्या खेळाडूंनी याठिकाणी सराव केला. यापूर्वी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर १९८२-८३ आणि १९९५-९६ या कालावधीत केवळ सहा सामने झाले होते. मुंबई संघाच्या बडोदा, गुजरात, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघांबरोबर लढती झाल्या होत्या. मात्र, सध्या शालेय किंवा इतर स्तरांवरील सामने भरवले जात होते. तसेच अ‍ॅथलेटिक्सपटूंसाठीसुद्धा हे मैदान दिले जात होते. परंतु, मागील पाच महिन्यांत ते घडवण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आणि नदीम मेमन यांनी मेहनत घेतली. त्यानुसार, आज या मैदानाचा खºया अर्थाने कायापालट झाला आहे. आता येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार झाली आहे. याठिकाणी सेलिब्रेटी लीगही खेळवण्यात आली होती. सोमवारपासून कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा नेटमध्ये सराव सुरू झाला आहे. दोन दिवस तो सुरू राहणार असून त्यानंतर बंगळुरू आणि इतर संघांनीही सरावासाठी या स्टेडिअमची मागणी केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

आयपीएलला हवे जाहिरातींसाठीही स्टेडिअम

भारताचा महान फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या आयपीएल टीमची जाहिरात, राजस्थान रॉयल्स या संघाचीही जाहिरात आणि एकूणच आयपीएलच्या या सीझनच्या जाहिरातींसाठी दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची मागणी आली असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

लाइट्स आणि छतही बदलले जाणार
रात्रीच्या वेळेसही या स्टेडिअममध्ये सराव करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि भविष्यात रणजी आणि आयपीएल सामने व्हावेत, या उद्देशाने येथे हायमास्ट लाइट्सची व्यवस्था करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरूकेल्या आहेत. यामध्ये सोलर एनर्जीचा वापर करण्याचा पालिकेचा विचार आहे. शिवाय, छतही बदलले जाणार आहे.

तीन वर्षांपासून या स्टेडिअमचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरूहोते. त्यानुसार, मागील पाच महिन्यांत त्याची आउटफिल्ड आणि खेळपट्टी तयार केली आहे. या मुंबईच्या जवळ असूनही हे स्टेडिअम दुर्लक्षित होते. परंतु, आता त्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर ठाण्याचे खेळाडू घडावेत, हीच इच्छा होती. त्यानुसार, या स्टेडिअमची खेळपट्टी तयार केली आहे.
- नदीम मेमन, खेळपट्टी तयार करणारे

पाच महिन्यांपूर्वी येथील खेळपट्टी पाहिली होती. त्यानंतर, आज येथील खेळपट्टी आणि आउटफिल्डमध्ये कमालीचा बदल झाला आहे. येथील खेळपट्टी आंतरराष्टÑीय दर्जाची झाली असून भविष्यात येथे रणजी सामने व्हावेत, ही इच्छा आहे.
- ओमकार साळवी, बॉलिंग कोच, कोलकाता नाइट रायडर्स

Web Title: The identity of the Dadoji Kondadeo sportshouse Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे