त्यांनी स्वत:च्या रक्ताने चितारली स्वातंत्र्यवीरांची चित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 09:52 PM2018-02-11T21:52:11+5:302018-02-11T21:52:45+5:30

एक अवलिया थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात शिक्षक आहे. त्याने बाबांच्या प्रेरणोतून स्वत:च्या रक्तातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या विरांची चित्रे चितारली आहे.

He painted freedom fighter with his own blood | त्यांनी स्वत:च्या रक्ताने चितारली स्वातंत्र्यवीरांची चित्रे

त्यांनी स्वत:च्या रक्ताने चितारली स्वातंत्र्यवीरांची चित्रे

Next

 डोंबिवली - जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गाँग याने स्वत:चा कान कापून स्वत:चेचे पोट्रेट तयार केले होते. चित्रकलेच्या दुनियेत त्याचे नाव आजही घेतले जाते. पण त्याच्या अवलियापणाला शोभेल असा एक अवलिया थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात शिक्षक आहे. त्याने बाबांच्या प्रेरणोतून स्वत:च्या रक्तातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या विरांची चित्रे चितारली आहे. या शिक्षकाचे नाव प्रल्हाद ठक असे आहे.  या चित्रंचे प्रदर्शन डोंबिवलीतील बालभवन येथे भरले आहे. त्याला पाहण्यासाठी नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
आनंदवनात शिक्षक असलेल्या ठक यांना थोर समाजसेवक बाबा आमटेचा सहवास लाभला. त्यांनी स्वत:च्या रक्ताने प्रथम बाबा आमटेचेच एक चित्र चित्तारले. हे पाहून बाबाही आवाक्  झाले. बाबानी त्याला स्वातंत्र विरांची चित्रे काढ. स्वातंत्र्य विरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले. त्यांची चित्रे रक्ताने चित्तारलशील तर ती खरी त्यांना श्रद्धांजली होईल. तसेच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. ठक यांनी बाबांचा शब्द शीरसावंद्य मानला. त्यांनी स्वत:च्या रक्ताने स्वातंत्र्यविरांची 1क्2 चित्रे चित्तारली आहे. एका चित्रला आठ एमएल ते 16 एमएल रक्त लागते. सरासरी 12 एमएल रक्त लागले आहे. 2क्क्8 पासून त्यांनी ही चित्रे काढली आहेत. स्वातंत्र्य विरांच्या बलीदानाची रक्ताची किंमत नव्या तरुण पिढीला कळावी. यासाठी हे प्रयोग केला आहे. त्यांच्या चित्रचे प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे कालपासून सुरु आहे. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व विविसू डेहरा यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात सगळीच चित्रे मांडली नसून 85 चित्रे मांडण्यात आलेली आहे. त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 
    या प्रदर्शनात सुरेंद्रनाथ बनर्जी, लालबहादूर शास्त्री, राजेंद्रप्रसाद, जगदीश चंद्रबोस, सी.वी.रामन, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, लालालजपत राय, रविंद्रनाथ टागोर, बकिंमचंद्र चट्टोपाध्याय, विनायक सावरकर, भिकाजी कामा, सरदार वल्लभभाई पटेल, शिवराम हरि राजगुरू, पंडित चंद्रशेखर आझाद, दादाभाई नौरोजी, सूयसेन, डॉ. पाडुरंग खानखोजे, तात्या टोपे, मंगल पांडे, आचार्य विनोबा भावे, पंडिता रमाबाई, महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आदींची चित्रे पाहायला मिळतात. 

चौकट- ठक यांनी 2007 मध्ये जगातील सर्वात मोठी रांगोळी काढली होती. चंद्रपूर पोलिस परेड मैदानात साधारणपणो अडीच एकर जागेत ही रांगोळी काढली. त्यासाठी 13 ट्रक्टर रांगोळी लागली होती. या रांगोळीची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. 2015 मध्ये श्री गणोश मंदिर संस्थानात धान्याची रांगोळी त्यांनी काढली होती. 

Web Title: He painted freedom fighter with his own blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.