राज्यपालांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:34 IST2018-10-13T00:34:10+5:302018-10-13T00:34:36+5:30

शहापूर तालुक्यातील वाफे येथील मुलींसाठी अनुदानित आश्रमशाळेचे वसतिगृह बांधण्यात आले आहे.

Governor will inaugurates ladies hostel today | राज्यपालांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे आज उद्घाटन

राज्यपालांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे आज उद्घाटन

ठाणे : शहापूर तालुक्यातील वाफे येथील मुलींसाठी अनुदानित आश्रमशाळेचे वसतिगृह बांधण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव १३ आॅक्टोबर रोजी शहापूर दौऱ्यावर येत आहेत.


हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन सकाळी १०.२० वाजता होणार असून त्यासाठी गोठेघर येते हेलिपॅड तयार करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.


राज्यपाल दौऱ्यावर येत असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरू आहे. आदिवासी विकास विभागाची अनुदानित मुलींची आश्रमशाळा वाफे येथे आहे. तेथील सुमारे एक लाख १६ हजार ७१७ चौरस फुटांच्या प्रांगणात बांधलेल्या या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येत आहे.


शुक्रवारी दुपारी त्यांचा दौरा निश्चित झाल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लोकमतला सांगितले. राजभवनहून राज्यपाल हेलिकॉप्टरनेथेट शहापूरच्या गोठेघर येथील हेलिपॅडवर उतरणार आहे. त्यासाठी खास हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

Web Title: Governor will inaugurates ladies hostel today

टॅग्स :Schoolशाळा