गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत माजिवड्याला मतदार जनजागृती

By सुरेश लोखंडे | Published: April 11, 2024 06:03 PM2024-04-11T18:03:28+5:302024-04-11T18:04:08+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले.

for upcoming lok sabha election 2024 voter awareness in majiwadya during the welcome procession of gudipadwa | गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत माजिवड्याला मतदार जनजागृती

गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत माजिवड्याला मतदार जनजागृती

सुरेश लोखंडे, ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले. येथील लोढा पॅराडाईज महिला संघ व हाऊसिंग फेडरेशन माजिवडा मानपाडा प्रभाग ठाणे येथे नोडल अधिकारी सुनिल यादव व नायब तहसिलदार तथा नोडल अधिकारी स्मितल यादव यांच्या मार्गदर्शनखाली स्वीप पथकाचे अशोक भोये व सर्व स्वीप कर्मचारी यांनी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी सर्व महिला व नागरिकांना १०० टकके मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थिताना यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व नवमतदार आदी तरुण पीढीने जास्तीत जास्त मतदान करावे,असे आवाहन यावेळी गांवकऱ्यांना करण्यात आले आहे.

Web Title: for upcoming lok sabha election 2024 voter awareness in majiwadya during the welcome procession of gudipadwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.