ठाण्यात गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 07:23 IST2018-09-12T07:19:48+5:302018-09-12T07:23:04+5:30
गोदाम बंद असल्यानं जीवितहानी टळली

ठाण्यात गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी
ठाणे: मुंब्र्यातील शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून एक ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
शिळफाटा रस्त्यावरील खान कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. गोदाम बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरात अनेक गोदामं असल्यानं आग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.