'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Published: February 19, 2024 02:42 PM2024-02-19T14:42:59+5:302024-02-19T14:44:52+5:30

Shiv Sena News: महाराष्ट्रात कुठेही आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढविली तर ठाकरे यांचा पराभवच होणार असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

Fight elections anywhere in Maharashtra in front of the Chief Minister, your defeat is certain, Shinde group MLA Vishwanath Bhoir warns Aditya Thackeray | 'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

- मुरलीधर भवार
कल्याण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे वय यांच्यात बरीच तफावत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व आणि कतृत्व ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आहे. ते रडत होते तर तुम्ही कशाला दिले. इतेकच नाही तर महाराष्ट्रात कुठेही आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढविली तर ठाकरे यांचा पराभवच होणार असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

रविवारी आदित्य ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यांनी शिंदे यांच्यावर टिका केली होती. या टिकेला आत्ता कल्याणचे शिवसेना आमदार भोईर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे सध्या सुसाट सुटले आहे. ते एका पक्षाचे युवा नेते आहेत. त्यांना बोलणे भाग पडते. ते बोलले शिवाय त्यांचे लोक त्यांना सोडून जातील. त्यांच्याजवळ राहणार नाही. त्यामुळे त्यांचे चालू असते. एकनाथ शिंदे यांनी रडून पद मिळविले. तुम्ही द्यायचे नव्हते. तुम्ही का दिले. त्यांचे नेतृत्व आणि कर्तूव ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराषट्राला माहिती आहे. त्याच बेसवर तुम्ही त्यांना जे द्यायचे होते. ते दिले. ते रडत होते तर तुम्ही द्यायचे नव्हते. मुख्यमंत्र्यांच्यासमोर ते महाराष्ट्रात कुठेही उभे राहू शकत नाहीत. शिंदे साहेबांचे जे काम आहे.

ते काम यांनी मागच्या पाच वर्षात सत्तेत असताना केले नाही. अडीच वर्षाच्या सत्तेतही केल नाही. जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी. त्यांच्या योजना काम करण्याची आणि प्रत्येकाला काम देण्याची पद्धत, मुख्यमंत्री असताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करणे हे त्यांच्या रक्त्तात आहे. ते आदित्य ठाकरे यांना जमणार नाही. त्यामुळे त्यांनी उभे राहावे. डिपा’झिट जप्त झाले नाही तर ठाकरे पडणार हे नक्की असा दावा आमदार भोईर यांनी केला आहे. 

उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल काएणाचेही दुमत नाहीत फक्त एकच म्हणणे आहे की, मराठा समाजाला आरक्षण देत असताना अन्य कोणत्या समाजाचे आरक्षण कमी करु नये. मराठा समाजाचा आक्रोश आंदोलनाची दखल घेतली आहे. भर सभेत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. गरजवंत आहेत. त्यांना आरक्षण मिळावे असे आमदार भोईर यांनी सांगितले.

कल्याणमधील  माघी गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मोठी असते. मुख्यमंत्री या ठिकाणी या आधीही आले आहेत. अनेक वेळा ते विसर्जन मिरवणूकीला येतात. त्यामुळे आज संध्याकाळी ते विसर्जन मिरवणूकीस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी केली पाहिजे असेही आमदार भोईर यांनी सांगितले.

Web Title: Fight elections anywhere in Maharashtra in front of the Chief Minister, your defeat is certain, Shinde group MLA Vishwanath Bhoir warns Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.