रुग्णांच्या आरोग्यासाठी पडघा पीएचसीला २५ लाखांच्या किंमतीच्या वस्तूंची मदत

By सुरेश लोखंडे | Published: March 22, 2024 08:06 PM2024-03-22T20:06:23+5:302024-03-22T20:06:45+5:30

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

Donation of goods worth 25 lakhs to Padgha PHC for the health of patients | रुग्णांच्या आरोग्यासाठी पडघा पीएचसीला २५ लाखांच्या किंमतीच्या वस्तूंची मदत

रुग्णांच्या आरोग्यासाठी पडघा पीएचसीला २५ लाखांच्या किंमतीच्या वस्तूंची मदत

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना तंदुरूस्त ठेवणे शक्य व्हावे, यासाठी इंटराईज कंपनीने त्यांच्या सीएसआर निधीतून संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) पडघा, ता. भिवंडी येथे ४१ प्रकारचे विविध वस्तू देण्यात आले आहे. आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. 

रुग्णांना फायदा होईल अशा अत्यावश्यक वस्तू इंटराईज कंपनीच्या फंडच्या माध्यमातून देण्यात आलेया आहेत. या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लोकसंख्या पाहता ६४ हजार २७५ इतकी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४७ गावांचा, २३ पाडे व २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी विविध सोईसुविधा वेळोवेळी पुरविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेता मेकिंग द डिफरन्स संस्थेमार्फत या २५ लाख रुपयांचे विविध वस्तू देण्यात आल्या. इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन शिसोदे यांनी यावेळी केले.

मी अपघातात माझ्या जवळच्या लोकांना गमावले आहे. आज त्यांची आठवण येते. कोणत्याही रुग्णांना वेळेत उपचार मिळावे आणि जगण्यासाठी परत नव आयुष्य मिळावे यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मी हाती धेतले असे,इंटराईज कंपनीचे प्रमुख पवन कांत यांनी सांगितले.

देण्यात आलेल्या विविध उपयोगी वस्तू-

मल्टीपॅरा मॉनिटर, आयसीयु बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, संगणक, टेबल, खुर्ची, मेडीसीन ट्रॉली, एअर कंडिशनर, फंक्शन बेड अशा एकूण ४१ वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या आहे.

Web Title: Donation of goods worth 25 lakhs to Padgha PHC for the health of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे