डोंबिवलीत डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, पंढरीच्या वारीची हुबेहूब आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 08:31 PM2017-11-21T20:31:51+5:302017-11-21T20:42:47+5:30

पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला.

Dabwaliyalit Pyaar Payિંગ Randan Sohala, Pandhari Varani HubHoBoH | डोंबिवलीत डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, पंढरीच्या वारीची हुबेहूब आठवण

डोंबिवलीत डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, पंढरीच्या वारीची हुबेहूब आठवण

googlenewsNext

डोंबिवली: पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला. टाळ मृदुंगाच्या टाळात ज्ञानोबा तुकारामाचा
 जय घोष आणि विठू माऊलीचा गजराने सगळा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमला होता.
आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन डोंबिवलीतील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. सावळाराम महाराज क्रीडा नगरीत हा महोत्सव होत आहे. सावळाराम महाराजांनी अध्यात्मीक कामाची मेहूर्त मेढ डोंबिवलीसारख्या शहरात रोवली. तिचा प्रचार प्रचार पंचक्रोषीत केला. त्यांच्या कार्याला स्मरुनच महोत्सवाची सुरुवात दिंडीने करण्यात आली. संतवाडीतून दिंडी निघाली. त्यात 555 मृदुंग वादक, 2 हजार टाळ वादक, 200 जणांनी भगवी पताका खांद्यावर घेतली. असा सगळा वारकरी मेळा त्यात सहभागी झाला. महिलांनी डोक्यावर तुळस घेतली. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष करीत दिंडी संतवाडी ते टिळक चौक, टिळक चौक ते घरडा सर्कल आणि घरडा सर्कलहून तिचे आगमन क्रीडा संकुलात झाले. त्याठिकाणी भव्य रिंगण धरण्यात आले. त्यावेळी दोन अश्व सोडले होते. हा सगळा मनोहरी रिंगण भक्तीमय सोहळा पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. इतक्या मोठय़ा संख्येने वारकरी सहभागी झाले. मात्र त्यांच्यात पंढरीच्या वारीची शिस्तच याठिकाणी पाहावयास मिळाली. कुठेही अनियोजन पाहावयास मिळाले नाही. विठूरायाच्या गजराने सगळा परिसर भक्तीमय झाल्याच्ो चित्र याठिकाणी पाहावयास मिळाले. जणूकाही ही पंढरीचीच वारी सुरु आहे असा फिल त्याठिकाणी होता. ज्ञानदेवाच्या पालखी सोहळ्य़ातील पारंपारीक चोपदार बाळासाहेब रणदिवे यांनी सांगितले की, प्रत्येक माणसाची सेवा परमेश्वर चरणी जमा होत असते. प्रत्येक भक्त त्यांचे दु:ख आणि यातना देवाच्या चरणी ठेवतो. देवाला वेगळे काही सांगण्याची गरज भासत नाही. वारीत शेतकरीही असतो. वारीत सहभागी होणारा शेतकरी पाऊस पडला नाही तर दु:खी होत नाही. त्याला परतीच्या पावसाची अपेक्षा असतो. त्याचा पांडूरंगावर विश्वास असतो. पंढरीच्या विठूकडे सगळे जण आपल्याप्रमाणो जगत कल्याणाची भावना ठेवतो. तशी करुणा भाकतो हे पंढरीच्या कानडा राजाच्या भक्तीचे वैशिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तीत मोठी ताकद आहे.

Web Title: Dabwaliyalit Pyaar Payિંગ Randan Sohala, Pandhari Varani HubHoBoH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.