कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता ४५ ते ४० हजारांची भरीव वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:37 IST2019-07-04T20:28:25+5:302019-07-04T20:37:06+5:30
राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जूनरोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी देखील लावून धरली होती. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले होते. कोकण विभागातील जिल्ह्यांसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते.

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे
ठाणे : राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणातील रूग्णालयांमध्ये,प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता ४५ ते ४० हजारांची भरीव वाढ करण्यात आल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या मानधन वाढीसाठी सतत पाठपुरावा करून अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरूवारी शासन परिपत्रक जारी केल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले.
यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जूनरोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी देखील लावून धरली होती. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले होते. कोकण विभागातील जिल्ह्यांसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते. एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही ‘समान काम - समान वेतन’ या तत्वावर मानधन देण्याची आवश्यकता आहे, असे निवेदनाव्दारे डावखरे यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते.
राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र, बीएएमएस डॉक्टरांचा उल्लेख केला नाही, याकडे डावखरे यांनी शिंदे यांचे लक्ष वेधले होते. याची दखल गांभीर्याने घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने आजच्या शासन परिपत्रकानुसार आदिवासी व दुर्गम भागात काम करणाºया डॉक्टरांना ४५ हजार रूपये, तर इतर भागात काम करणाºया डॉक्टरांना ४० हजार रूपये एवढे भरीव मानधन लागू केले आहे. यामुळे कोकण विभागातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील रु ग्णांना आता या डॉक्टरांकडू अधिक व उत्तम आरोग्य सुविधा देण्याची अपेक्षा डावखरे यांनी या डॉक्टरांकडून केली आहे.